घोडी नाही म्हणून नवरदेव थेट निघाला गाढवावरून, VIDEO पाहून नेटकरी हसून लोटपोट

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर Viral झाला आहे.

Updated: Oct 30, 2022, 01:30 PM IST
घोडी नाही म्हणून नवरदेव थेट निघाला गाढवावरून, VIDEO पाहून नेटकरी हसून लोटपोट title=

मुंबई : वधू आणि वरांचा (Bride Groom Video) एकतरी व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो आणि नेटकरी देखील या व्हिडिओंचा खूप आनंद घेतात. लग्न हा वधू-वरांच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो. या दिवसासाठी वधू आणि वर विशेष तयारी करतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये वरानं असं काही केलं आहे की, तो चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये वराला पाहून लोकांचे हसू आवरत नाहीये. त्याच्या या विचित्र वागण्यानं लोक आश्चर्यचकित होत आहेत. (Bride Groom Viral Video)

होय, (Trending Video वराला मिरवणुकीत घोडीवर जायचे होते, परंतु जर घोडी सापडली नाही तर त्यानं दुसरी कल्पना काढली. वराला घोडी मिळाली नाही तर त्यानं गाढवावर बसून मिरवणूक काढल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. वास्तविक वरानं घोडी आणण्यासाठी बराच वेळ वाट पाहिली, पण घोडी न सापडल्यानं त्यानं गाढवावर बसून बाराज घेऊन जाण्याचे ठरवले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘funtaap’ या अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना हसू अनावर झालं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.