Wedding Video : मुलींसोबत असं करत होता नवरदेव, नववधुने पाहिलं तर हे झाले असे हाल

नववधु रागाने झाली लालबुंद 

Updated: Sep 30, 2021, 12:57 PM IST
Wedding Video : मुलींसोबत असं करत होता नवरदेव, नववधुने पाहिलं तर हे झाले असे हाल  title=

मुंबई : लग्न समारंभ असला की, प्रत्येकाला नटायचं असतं. मग ते नववधु असो किंवा नवरदेव. सगळ्यांनाच कार्यक्रमात चर्चेत राहायचं असतं. प्रत्येकाला नववधु आणि नवरदेवासोबत सेल्फी क्लिक करायचे असतात. अशाच काही मेहुण्या फक्त आपल्या नव्या जीजूंसोबत सेल्फी क्लिक करण्यात इंटरेस्टेड असतात. पण या इंटरेस्टचा पुढे काय परिणाम होतो, हे पुढील व्हिडीओत पाहा. 

मुलींसोबत फोटो क्लिक करत होता नवरदेव 

लग्नाच्या दिवशी नवरदेव नववधुपासून दूर उभं राहून मुलींसोबत गप्पा मारायचा होता. फोटो क्लिक करताना मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच होता. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नववधु किती रागात आहे. 

एक मुलगी वराला फुले देत आहे, तर दुसरी मुलगी वराच्या गळ्यात लटकलेली माला धरून आहे. या दरम्यान, वराचा आनंद वेगळ्या प्रकारे दिसत होता, जेव्हा कॅमेरामनने काही अंतरावर उभ्या असलेल्या वधूच्या दिशेने कॅमेरा फिरवला आणि ती खूप रागावल्याचे दाखवले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nikan (@nikan_dusky)

नववधु झाली रागाने लाल

वधूचा चेहरा पाहून हे समजले जाऊ शकते की वर तिच्याकडे येताच ती नक्कीच चार गोष्टी सांगेल. वधूचा राग पाहण्यासारखा असेल. एवढेच नाही तर वधूजवळ उभी असलेली तिची मैत्रीणही स्तब्ध दिसत होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य येईल. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. Nikan_dusky नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ Instagram (Instagram Reels) वर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. इतर अनेक युझरनेही या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या.