बाबो! घराच्या टॉयलेटमध्ये घुसली खतरनाक मगर, पाहा VIDEO

घरातील शौचालयामध्ये बसली होती मगर, video होतोय व्हायरल!

Updated: Oct 11, 2022, 10:08 PM IST
बाबो! घराच्या टॉयलेटमध्ये घुसली खतरनाक मगर, पाहा VIDEO title=

Gujarat Crocodile News : घराच्या बाहेर असलेल्या शौचालयामध्ये मगर बसल्याचं गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील सोजित्रा येथील खाराकुवा इथं दिसून आलं आहे. मगर थेट घराबाहेर असलेल्या शौचालयात आल्याने स्थानिकांमध्ये  वातावरण तयार झालं आहे. या मगरीची शौचालयात असताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Gujarat Crocodile Viral Video) 

खाराकुवा इथं एक तलाव असून त्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मगरींचं वास्तव्य  आहे. पहाटे पाचच्या सुमारास संबंधित कुटुंबातील एक सदस्य शौचालयाला गेला होता. त्यावेळी शौचालयात मगर दिसल्याने तो घाबरला. घरातील शौचालयात मगर असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच सर्व ग्रामस्थ घाबरले.  ही माहिती वनविभागाच्या पथकाला देण्यात आली.

 

वनविभागाच्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ सोजित्रा येथील खारकुवा परिसरात पोहोचून 6 फूट लांबीच्या मगरीची सुटका केली. गावातील तलावात मगरी मोठ्या प्रमाणात राहतात. स्थानिक प्रशासनाने आतातरी शहाण होत या मगरींचा बंदोबस्त करायला हवा. नाहीतर मोठा घातपात होण्याची शक्यता आहे.