गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज

राजकोट पश्चिम ही भाजपचा गड मानला जातो. गेल्या 24 वर्षात एकदाही भाजपनं ही जागा गमावलेली नाही. 

Updated: Nov 20, 2017, 04:23 PM IST
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज title=

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आज राजकोट पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राजकोट पश्चिम ही भाजपचा गड मानला जातो. गेल्या 24 वर्षात एकदाही भाजपनं ही जागा गमावलेली नाही. 

काँग्रेस उमेदवारांचा वाढता आत्मविश्वास

शिवाय याच मतदारसंघानं नरेंद्र मोदीसह तीन मुख्यमंत्री गुजरातला दिले आहेत. पण यंदा पाटीदार आंदोलन आणि हार्दीक पटेलच्या प्रभावामुळे इथेही काँग्रेसच्या उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

मोटर सायकलवरून मंदिरात दर्शनाला

आज सकाळी मुख्यमंत्री मोटर सायकलवर बसून राजकोटमध्ये असणाऱ्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. रहदारीला अडथळा होऊ नये, म्हणून मोटरसायकलवर वापरल्याचं स्पष्टीकरण यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं.