नवरा-बायकोमध्ये कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात दोघांनी नदीत उडी घेतली अन्...

Couple Jump Into River: पती-पत्नी दोघांमधील भांडणे काही समाजासाठी नवीन नाहीत. मात्र, याच भांडणातून एका जोडप्याने जीव द्यायचा प्रयत्न केला. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 23, 2023, 10:25 AM IST
नवरा-बायकोमध्ये कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात दोघांनी नदीत उडी घेतली अन्...  title=
hariyana Newly wed couple jump into river villegers rescued

Husband And Wife Jump Into River: नवरा-बायकोमधील (Husband -Wife) भांडणं कधी कधी टोक गाठतात. हरियाणातील (Hariyana)फतेहाबाद पती-पत्नीमधील वाद इतके टोकाला गेले की दोघांनीही नदीच्या वाहत्या पाण्यात उडी घेतली. नदीच्या पाण्यात वाहत जात असताना काही ग्रामस्थांची नजर त्यांच्यावर पडली. दोघांनाही तातडीने पाण्याबाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना सूचना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Couple Jump Into River)

नवरा-बायकोत कडाक्याचे भांडण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील फतेहाबादमध्ये नवरा-बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात पती-पत्नी दोघांनी घग्गर नदीच्या पाण्यात उडी घेतली. भांडणातून दोघांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बचावकार्य करत असलेल्या लोकांनी दोघांना वाहत्या पाण्यात बुडताना पाहिले त्यानंतर ग्रामस्थांनी नदीत उडी घेत दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

पोलिस घटनास्थळी दाखल

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचे जबाब दाखल करत कारवाई सुरु केली आहे. पती-पत्नी दोघंही मिराना गावचे रहिवाशी आहेत.

पोलिसांनी सांगितलं काय घडलं?

रतिया ठाण्याचे एसएसओ कुलदिप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार बलियाला गावातून वाहत असलेल्या घागरा नदीत एक तरुण आणि एक तरुणी वाहत जात असताना सापडले. दोघांनाही गावातील लोकांनी नदीतून बुडताना वाचवले आणि जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. पतीचे नाव गुरसेवक असून तो मिराना गावातील रहिवाशी आहे. गुरुसेवकचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर दोघांनीही नदीत उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दोघांचे जबाब घेऊन पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर दोघा पती-पत्नीवर नेटकऱ्यांनी टिका केली आहे.