HDFC बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

एचडीएफसी बॅंक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल करतात.

Updated: Nov 12, 2017, 12:14 PM IST
HDFC बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल  title=

 मुंबई : एचडीएफसी बॅंक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत त्यांच्या पॉलिसीमध्ये बदल करतात.

आता एचडीएफसी बॅंकेने सेव्हिंग अकाऊंटमध्ये बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वी बॅंकेने ऑनलाईन ट्रांझेशनमध्ये बदल केले. मात्र आता केलेले हे बदल क्लासिक कस्टमर्ससाठी लागू आहेत. 
 
 काय आहेत नवे बदल ? 
 एचडीएफसीने सेव्हिंग अकाऊंटमध्ये केलेल्या नव्या बदलानुसार त्यांना  दर महिना किमान १ लाख रूपये ठेवावे लागतील.  
 
 एफडीमध्येही बदल 
 नव्या बदलानुसार सेविंग अकाऊंट आणि एफडीदेखील लिंक होणार आहे. यामध्ये तुम्ही किमान ५ लाख रूपये ठेवू शकता. सेविंग अकाऊंटमध्ये १ लाख तर टर्म डिपॉजिटमध्ये किमान ५ लाख रूपये ठेवणं गरजेचे आहे. हा नवा नियम ९ डिसेंबरपासून लागू होणार आहे.  
 
 ऑनलाईन ट्रानझॅक्शन फ्री 
 एचडीएफसीने सध्या आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारा ऑनलाईन ट्रानझॅक्शन फ्री केलं आहे. १ नोव्हेंबरपासून हे ऑनलाईन ट्रानझॅक्शन निशुल्क करण्यात आले आहे. यामुळे डिजिटल ट्रान्झॅक्शनला चालना मिळाली आहे.