हेमा मालिनी बैलाच्या हल्ल्यात थोडक्यात बचावल्या

मथुरा स्टेशनवर अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी या बैलाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या आहेत.

Updated: Nov 5, 2017, 11:35 AM IST
हेमा मालिनी बैलाच्या हल्ल्यात थोडक्यात बचावल्या  title=

 मथुरा : मथुरा स्टेशनवर अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी या बैलाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्या आहेत.

हेमा मालिनींच्या सुरक्षेमध्ये कसूर झाल्याने स्टेशन सुपरीटेंडेंटवर कारवाई करण्यात आली आहे. 

 मथुरा स्टेशनवर काही चलतचित्र, पेंटींग लावण्याचा प्रयोग हेमा मालिनी करणार आहेत. यासंबंधी जागा आणि स्थिती पहाण्यासाठी हेमा मालिनी मथुरा स्टेशनवर आल्या होत्या. मात्र अचानक तेथील बैल उधळला. तो हेमा मालिनींच्या समोर आला. तात्काळ तेथील काही युवकांनी हेमा मालिनींना सुरक्षित ठेवत बैलाला रोखले. 

 रेल्वे प्रशासनाने सदर प्रकरणी तात्काळ कारवाई करत के. एल. मीना यांना हटवले.  स्टेशन परिसरामध्ये भटक्या प्राण्यांचा त्रास पाहता वेळीच पाऊलं न उचलण्याचा ठपका ठेवत के. एल. मीना यांना हटवण्यात आले आहे. त्याजागी पीएल मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.