हिमाचल प्रदेश एक्झिट पोल: काय होणार इथे भाजप-कॉंग्रेसचं?

गुजरातसोबतच हिमाचल प्रदेश निवडणुकीचीही जोरदार चर्चा रंगली आहे. हिमाचलमध्ये एकूण ६८ जागा असून इथे कॉंग्रेस सत्ताधारी पक्ष आहे. मात्र, एनबीटी आणि सी-वोटर यांच्या एक्झिट पोलमध्ये इथे सत्तेत मोठा बदल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. 

Updated: Dec 14, 2017, 06:12 PM IST
हिमाचल प्रदेश एक्झिट पोल: काय होणार इथे भाजप-कॉंग्रेसचं? title=

नवी दिल्ली : गुजरातसोबतच हिमाचल प्रदेश निवडणुकीचीही जोरदार चर्चा रंगली आहे. हिमाचलमध्ये एकूण ६८ जागा असून इथे कॉंग्रेस सत्ताधारी पक्ष आहे. मात्र, एनबीटी आणि सी-वोटर यांच्या एक्झिट पोलमध्ये इथे सत्तेत मोठा बदल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. 

भाजपला किती जागा?

हिमाचल प्रदेशच्या ६८ सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपाला मोठा फायदा मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इथे भाजपला ४१ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यत आलाय. म्हणजे इथे १५ जागांचा फायदा भाजपला मिळण्याचा अंदाज आहे. 

कॉंग्रेसला किती जागा?

तर सत्ताधारी कॉंग्रेसला हिमाचलमध्ये फट्का बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सत्ताधारी कॉंग्रेला यावेळी १५ जागांचा फटका बसून २५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर इतरांना दोन जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

भाजपला २०१२ च्या तुलनेत यावेळी ९.२ टक्क्यांनी मतांची टक्केवारी अधिक मिळण्याचा अंदाज आहे. त्यांना एकूण ४७.६ टक्के मतदान होणार असल्याचा अंदाज आहे. याआधीच्या निवडणुकीच्या तुलनेत कॉंग्रेसला ४४ टक्के मतदान मिळण्याचा अंदाज आहे. 

भाजपच्या दृष्टीने पाहायचं तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी फायदा होण्याची शक्यता आहे. २०१२ मध्ये  भाजपलाला २६ जागा मिळाल्या होत्या. तर कॉंग्रेसला ३६ जागा मिळाल्या होत्या. तसेच भाजपला यावेळी १५ जागा जास्त मिळण्याचा अंदाज आहे. अर कॉंग्रेसला मागच्या तुलनेत यावेळी ११ जागा कमी मिळण्याचा अंदाज आहे. तर इतरांना ६ ऎवजी दोनच जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

कोणत्या क्षेत्रात कुणाला किती जागा?

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू विभागात भाजपला १०, कॉंग्रेसला ५ आणि इतरांना एक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तसेच चंबा क्षेत्रात भाजपला १४ जागा, कॉंग्रेसला ६ आणि इतरांना एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे. 

तर शिमला विभागात कॉंग्रेस प्रभावी असून इथे त्यांना ९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर मैदानी परीसरांमध्ये भाजपला ९ आणि कॉंग्रेसला ९ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.