डायलासिस करायला गेले आणि HIV पॉझिटीव्ह होऊन आले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

West Bengal News: रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. येथे उपकरण योग्य प्रकारे निर्जंतुक केली जात नाहीत. स्वच्छता घेतली जाता नाही. विशेषत: डायलिसिस उपचार घेत असलेल्या रुग्णांची जादा काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सर्रासपण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Apr 25, 2023, 06:40 PM IST
डायलासिस करायला गेले आणि HIV पॉझिटीव्ह होऊन आले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार title=

West Bengal News: सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड केली जाते. दुर्लक्षित कारभारामुळे रुग्णांना प्रचंड मनस्ताप करावा लागतो. कधी कधी तर ढिसाळ कारभार रुग्णांच्या जीवावर देखील बेततो. मात्र, पश्चिम बंगाल मधील एका सरकारी रुग्णालायात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. डायलासिस करायला केलेल्या रुगणांना HIV ची बाधा झाली आहे. जवळपास पाच रुग्ण  HIV पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. 

पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कल्याणी जेएनएम रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे काही रुग्ण उपचारासाठी आले होते. या रुग्णांवर डायलासिस  पद्धतीने उपचार करण्यात आले.  डायलासिस केल्यानंतर यांना HIV ची लागण झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी कल्याणी जेएनएम रुग्णालयाविरुद्ध आरोग्य विभागात तक्रार दाखल केली आहे. आरोग्य सचिव नारायण स्वरूप निगम यांनी यासंदर्भात कल्याणी जेएनएम रुग्णालयात अहवाल मागवला आहे.

कल्याणी जेएनएम रुग्णालयात  किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. येथे डायलासिसची सुविधा देखील उपलब्ध आहे. मात्र, डायलासिस ट्रीटमेंट करताना निष्काळजीपणा केला जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

कल्याणी जेएनएम रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये डायलिसिस घेत असलेल्या 2 महिलांसह 5 रुग्णांना जानेवारी ते मार्च दरम्यान एचआयव्हीची लागण झाल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी हा आरोप केला आहे. डायलासिस मशीनमध्ये रक्त  शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान रुग्णांना  एचआयव्हीची लागण झाल्याचा दावा केला जात आहे. 

रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. येथे उपकरण योग्य प्रकारे निर्जंतुक केली जात नाहीत. स्वच्छता घेतली जाता नाही. विशेषत: डायलिसिस उपचार घेत असलेल्या रुग्णांची जादा काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सर्रासपण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

डायलिसिस उपचार का आणि कशा प्रकारे केले जातात?

किडनीचा आजारात डायलिसिस उपचार केले जातात. जेव्हा सर्व प्रकारची औषधे तसेच उपचार पद्धती अयशस्वी ठरतात आणि किडनी निकामी होते तेव्हा रुग्णांवर डायलिसिस उपचार केले जातात. डायलिसिसद्वारे शरीरातील रक्त शुद्धीकरण केले जाते. डायलेसिस मशीनद्वारे रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते.