Master आणि Visa कसं काम करतात, जाणून घ्या ग्राहकांच्या खिशातून पैसे कसे काढतात

 हे लक्षात घेण्याासारखे आहे की, दोन्ही कार्ड कंपन्या ग्राहकांना थेट कार्डे देत नाहीत.

Updated: Jul 18, 2021, 07:11 PM IST
Master आणि Visa कसं काम करतात, जाणून घ्या ग्राहकांच्या खिशातून पैसे कसे काढतात title=

मुंबई : रिझर्व्ह बँकेने नुकतीच मास्टरकार्डवर बंदी घातली आहे. यानंतर हे कार्ड चर्चेचा विषय बनला आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसा हे दोघेही भारतातील पेमेंटसाठीचे सर्वात मोठे स्त्रोत मानले जातात. तुम्ही तुमचा डेबिट आणि क्रेडिट कार्ड पाहू शकता त्यावर मास्टरकार्ड किंवा व्हिसा लिहलेले असते. हे दोन्ही कार्डे अखेर कसे काम करतात? त्यांना कशी फी मिळते? यात त्यांचा फायदा काय? असे प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाले असतील.

येथे हे लक्षात घेण्याासारखे आहे की, दोन्ही कार्ड कंपन्या ग्राहकांना थेट कार्डे देत नाहीत, परंतु बँकांद्वारे ग्राहकांना ते दिले जातात. बँकांचे या दोन्ही कंपन्यांशी करार आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना कार्ड दिले जाते. यात क्रेडिट, डेबिट आणि प्रीपेड कार्डदेखील ग्राहकांना दिले जातात.

ही कार्डे कसे कार्य करतात?

मास्टरकार्ड आणि व्हिसाचे काम समान आहे. ही दोन्ही कार्डे एटीएम कार्डप्रमाणेच काम करतात. यामध्ये कार्डधारक, कंपनी किंवा व्यवसाय, बँक आणि कार्ड कंपनी (मास्टरकार्ड आणि व्हिसा) यांच्यात भागीदारी आहे. कार्ड कंपन्या त्यांची सेवा बँकांना देतात. त्यानंतर बँका तेच कार्ड ग्राहकांना देतात. जेव्हा ग्राहक या कर्डद्वारे एखादे व्यवहार करतात, तेव्हा याचे देयक कंपनीला दिले जातात.

मर्चंट पॉईंट ऑफ सेल सिस्टम ग्राहकांच्या खात्याचा सर्व तपशील घेतो आणि ज्या व्यवसायासाठी कार्ड स्वॅप केले जाते, त्या व्यवसायाला किंवा त्याच्या मर्चंटला पेमेंट दिले जाते किंवा त्यांचा हिस्सा त्यांना दिला जातो.

संपूर्ण माहिती कंपनीकडे जाते

कार्ड जारी करणारी बँक व्यवहारास ऑथराइज करते आणि त्याचा रेस्पॉन्स मर्चेंटकडे जातो. यानंतर, कार्डमधून त्या व्यापारी किंवा व्यवसायाकडे पैसे हस्तांतरित केले जातात. ज्या खात्यात ग्राहकाचे खाते आहे किंवा ज्या बँकेतून मास्टरकार्ड किंवा व्हिसा कार्ड आहे अशा बँकेतून पैसे व्यापा-याला हस्तांतरित केले जातात.

जेव्हा जेव्हा एखादा ग्राहक हे कार्ड वापरतो, तेव्हा त्याची संपूर्ण माहिती त्या कंपनीच्या सर्व्हरवर जाते. या कंपन्यांचे सर्व्हर परदेशात आहेत. जिथे माहितीची प्रक्रिया आणि वेरिफिकेशन केले जाते. ज्या बँका या कार्डच्या सेवा वापरतात त्या प्रत्येक 3 महिन्यानंतर फी भरतात.

कार्ड कंपन्या पैसे कसे कमवतात?

BankBazaarचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कार्डवरील प्रत्येक व्यवहारासाठी एक इंटरचेंज फी आकारली जाते. व्यवहारासाठी ही रक्कम फारच कमी आहे.

ही रक्कम प्रति व्यवहार 0.5-3.5% पर्यंत असू शकते. ही फी कार्ड देताना निश्चित केली जाते. बँकांचा देखील यात काहीसा हिस्सा असतो. म्हणून, जेव्हा जेव्हा ग्राहकाच्या व्यवहारानंतर जी रक्कम कापली जाते ती रक्कम बँक आणि कार्ड कंपनीकडून वाटून घेतली जाते - मास्टरकार्ड किंवा व्हिसा हे कार्ड कंपन्यांचे वास्तविक उत्पन्न आहे.

याशिवाय कार्ड कंपन्या बँकांकडून वार्षिक परवाना शुल्कदेखील आकारतात. बँकांना या कार्डवर आपले नाव, लोगो किंवा ब्रँड छापायचे असेल, तर त्यासाठी त्यांना वेगळी फी भरावी लागते. कार्ड कंपन्या व्यवहार प्रक्रियेत सहभागी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे प्रमाणपत्र देतात. या कार्ड कंपन्यांना कोणत्याही बँकेशी व्यवहार ठेवण्यापूर्वी असे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. जेणेकरून सुरक्षित बँकिंग प्रणालीस मदत होईल.