Aadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक...नाहीतर ३१ मार्चनंतर...

Adhaar - PAN Linking : पॅन आधारशी लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे 

Updated: Jan 17, 2023, 06:27 PM IST
Aadhar-Pan Linking : पॅन कार्ड आधारसोबत असे करा लिंक...नाहीतर ३१ मार्चनंतर... title=

Aadhar-Pan Linking Last Date : इन्कम टॅक्सकडून एक महत्वाची आणि मोठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे . शनिवारी ही अधिसूचना जारी करण्यात आलीये. यानुसार, तुम्हाला लवकरात लवकर तुमचं पण कार्ड आधार कार्डला लिंक करावं लागणार आहे कारण ३१ मार्चपर्यंत जर तुम्ही लिंक केलं नाहीत तर ते बिनकामाचे समजण्यात येईल.जर तुम्हीसुद्धा अद्याप तुमचं पॅन आधारशी  लिंक केल नसेल तर घाई करा ताबडतोब हे काम उरकून घ्या. (how to link pan card with aadhar card online news in marathi)

असं न केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आयटी रिटर्न तुम्ही फाईल करू शकणार नाहीत, इतकंच काय तर, आवश्यक अश्या सुविधांचा लाभसुद्धा घेऊ शकणार नाहीत. तुम्ही घरबसल्या पॅन कार्ड आधारसोबत लिंक करू शकतात, पॅन ते करण्यासाठी काही गाईडलाईन्स पाळाव्या लागतील , काय आहेत त्या गाईडलाईन्स चला जाणून घेऊया. 

पॅनला आधारशी लिंक कसे कराल

  •  पॅन आधारसोबत लिंक करण्यासाठी तुम्हाला बँक कस्टमर केअरला कॅल करायचा आहे.   
  •  कॉल केल्यानंतर  IVR मेन्यूचा ऑप्शन दिसेल यात जाऊन राईट मेन्यू ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल.  
  •  हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा कस्टमर केअर एग्झिक्यूटिव्हला कनेक्ट करा.
  •  एग्झिक्युटिव्ह तुम्हाला क्वेरी विचारेल तेव्हा, त्यांना सांगा कि तुम्हाला पॅन कार्ड आधारसोबत लिंक करायचे आहे. 
  •  वेरिफिकेशनसाठी काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील, तुम्हाला याची उत्तर द्यायची आहेत. 
  •  पॅन कार्ड नंबर विचारला जाईल तो सांगायचा आहे. 

ऑनलाईन कसा कराल पॅन आधारसोबत लिंक 

  • यासाठी तुम्हाला incometax.gov.in/iec/foportal या साईटला विझिट करावं लागेल 
  • पेज ओपन झाल्यावर  'Quick Links' या सेक्शनवर क्लीक करा, स्क्रोल केल्यावर लिंक आधार हा ऑप्शन दिसेल. 
  •  यात नाव नोंदवावा लागेल. या नंतर मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर तिथे टाकायचे आहेत.
  •  आता व्हेरिफिकेशन ऑप्शन सिलेक्ट करा. 
  •  आता continue ऑप्शनवर क्लिक करा.  
  •  तुमचा आधार कार्डसाठी असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे यावर एक OTP येईल.   
  •  आता तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केल जाईल. (how to link pan card with aadhar card online news in marathi)