20 वर्षांचे होम लोन, SIPच्या माध्यमातून वसुल होईल EMI; फक्त समजून घ्या 'हा' फॉर्म्युला

SIP To Recover Home Loan: होम लोन घेतल्यानंतर आपली संपूर्ण जमापुंजी कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी जातात. अशावेळी या पद्धतीने तुम्ही रिकव्हर करु शकता. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 14, 2024, 04:57 PM IST
20 वर्षांचे होम लोन, SIPच्या माध्यमातून वसुल होईल EMI; फक्त समजून घ्या 'हा' फॉर्म्युला title=
How to recover home loan interest through SIP mutual fund

SIP To Recover Home Loan: महागाईच्या काळात स्वतःच घर घेण्याचे स्वप्न होम लोनमुळं साकार होऊ लागलं आहे. मुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर असणे हे खूप महत्त्वाचं आहे. अशावेळी होम लोनच्या मदतीने तुमचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँका वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देतात. एकदा का होम लोन घेतलं की त्याचबरोबर त्याचे ईएमआय भरण्याचे मोठे टेन्शन असते. बँका मोठ्या प्रमाणात व्याज आकारतात. एका अर्थी आपण घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट व्याज आपण भरत असतो. 

घरासाठी कर्ज घेत असताना आपण कितीतरी जास्त पैसे आकारतो आणि नंतर त्याचा पश्चात्ताप करतो. मात्र तुम्ही घराचे पैसे परतही मिळवू शकतात. एका SIPच्या माध्यमातून तुम्ही होम लोनची पूर्ण किमत वसूल करु शकता. त्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या. 

होम लोनच्या बदल्यात तुम्ही किती व्याज देता?

समजा तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामधून 30 लाखांचे कर्ज 25 वर्षांसाठी घेतलंय. एसबीआयमध्ये होम लोनचा व्याज दर 9.55% असेल. तर, अशातच SBI होम लोन कॅल्यक्युलेटरच्या हिशोबाने तुम्ही 25 वर्षांत बँकेला 78,94,574 परतावा देतात. जर तुम्ही 20 वर्षांसाठी लोन घेतलंय तर तुम्हाला  67,34,871 रुपये बँकेला द्यावे लागतील. 15 वर्षांसाठी कर्ज घेतलं असेल तर 9.55 टक्के व्याजदराने 56,55,117 रुपये बँकेला द्यावे लागतील. कर्जाची वर्षे जर कमी झाली तर ईएमआय वाढतो. मात्र, कर्ज घेतल्यानंतर त्या बदल्यात त्याच्यापेक्षा जास्त पैसे बँकेला द्यावे लागतात. 

होम लोन कसं रिकव्हर करणार 

जर तुम्हाला होम लोन रिकव्हर करायचे असेल तर म्युच्युअल फंड SIPच्या माध्यमातून करु शकता. त्यासाठी होम लोनचे EMI सुरू होण्याबरोबरच तितक्याच वर्षांसाठी महिन्याची SIP सुरू करायला हवी. मुद्दल आणि व्याजासह होम लोनचे पैसे वसुल करण्यासाठी तुमच्या EMIच्या 20 ते 25 टक्के रक्कमेने SIP सुरू करायला हवी. यामुळं आरामात तुमचे होम लोन संपेपर्यंत बँकेला जितका निधी द्याल तितका निधी तुम्ही सहज कमवाल. 

रक्कम कशी रिकव्हर होईल 

- संपूर्ण होम लोनः 30 लाख रुपये

- वर्षेः 20 लाख

- EMI: : 28,062 रुपये

- लोनवर एकूण इंटरेस्टः 37,34,871 रुपये

- मुद्दल आणि व्याजसह एकूण पेमेंटः 67, 34, 871 रुपये

SIPचा फॉर्मुला समजून घ्या

SIP ची रक्कमः EMIच्या 25 टक्के (7.015 रुपये)

गुंतवणुकीची कालावधीः 20 वर्षे

परतावा कधी येणारः 12 टक्के वर्षाला

20 वर्षानंतर SIP ची व्हॅल्यूः  70,09,023 रुपये 

(Disclaimer: वरील माहिती सर्वसामान्य संदर्भ आणि उपलब्ध आकडेवारीच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. हा अंतिम आर्थिक सल्ला नसून कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)