लग्नानंतर घरात नॉनव्हेज शिजवले, पतीने केलं असं काही की पत्नी माहेरीच गेली

Trending News: पत्नीने घरात नॉन व्हेज बनवण्यास सुरुवात केली. मात्र पतीला तिचे हा वागणे आवडले नाही, त्यामुळं पत्नीने घेतला मोठा निर्णय 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 28, 2024, 03:57 PM IST
लग्नानंतर घरात नॉनव्हेज शिजवले, पतीने केलं असं काही की पत्नी माहेरीच गेली title=
husband scold his wife for cooking non-veg at home

Trending News: पानीपतमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याच्या लव्हस्टोरीमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. चार वर्षांपूर्वी ते प्रेमात पडले त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. मात्र लग्नानंतर आता त्यांचे नाते घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. लग्नाच्या अडीच वर्षानंतर आता जेवणाच्या व खाण्या-पिण्याच्या सवयीमुळं त्यांच्या त्यांच्या वैवाहिक जीवनात कटूता निर्माण झाली आहे. चार वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली नंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. चार वर्षांच्या अफेअरनंतर या जोडप्यांने लग्न केले. लग्नानंतर सगळंकीही सुरळीत सुरू होते. मात्र, अचानक क्षुल्लक गोष्टीवरुन वाद झाला आणि पत्नी माहेरी निघून गेली. 

लग्नानंतर मुलाने मुलीजवळ एक अट ठेवली होती. त्या अटीनुसार, मुलीला नॉनव्हेज खायचे असल्यास ती फक्त बाहेर जाऊनच खाईल. घरात नॉनव्हेज बनणार नाही. कारण मुलाच्या घरात नॉनव्हेज बनत नाही आणि या एकच अटीवर मुलाने तिच्याशी लग्न केले. मात्र, लग्नानंतर मुलगी घरात कधी कधी नॉनव्हेज बनवायची. यामुळंच त्यांच्यात भांडणे व्हायची. नॉनव्हेजची आवड असल्याने तरुणी स्वतःला रोखू शकली नाही. त्यामुळं ती घरात नॉनव्हेज शिजवायची. मात्र, याचा त्रास मुलाला होऊ लागला. 

लग्नानंतर पती-पत्नी दोघेही बाहेर नॉनव्हेज खाण्यासाठी जात असतं. दोघांचा संसार सुरळीत चालला होता. त्यांना बाळदेखील झाले. लग्नाला अडीच वर्षे झाले होती. पत्नी बाहेर नॉनव्हेज खातच होती. मात्र, आता तिने हळूहळू घरात बनवायला सुरुवात केली. बाहेर नॉनव्हेज खाणे महाग पडते आणि पत्नीला तिच्या आवडी-निवडीनुसार चिकन-मटण बनवायचे असायचे. त्यामुळं तिने घरातच नॉनव्हेज बनवायला सुरुवात केले. मात्र, तिचे हे वागणे पतीला आवडले नाही. त्याने तिला तसं न करण्यास सांगितले. मात्र, त्यावरुन त्यांच्यात वाद व्हायला लागले. 

2022मध्ये या रोजच्या वादाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. मुलाचा संसार तुटेल यामुळं सासु चिंतेत होती. त्यामुळं तिने महिला संरक्षण व बाल विवाह महिला अधिकाऱ्यांकडे गेली आणि मुलाचा संसार वाचवण्याची विनंती केली. महिला अधिकाऱ्याने पती आणि पत्नीला बोलावले आणि त्यांच्याशी  चर्चा केली. व वादाचे नेमके कारण काय याची चर्चा केली. 

पैसे किंवा आर्थिक वादातून त्यांच्यात भांडणे होत नव्हती तर पत्नीला घरातच नॉनव्हेज बनवायचे होते पण पती नकार देत होता. त्यामुळं त्यांच्यात वाद होत होते. यामुळंच ती वैतागून घर सोडून गेली आणि माहेरी राहू लागली. पत्नीने घटस्फोटाचीदेखील मागणी केली आहे. सध्या या दोघांचेही समुपदेशन सुरू आहे. जेणेकरुन दोघांचा संसार वाचेल.