ICICI बँककडून ग्राहकांना अलर्ट! मोबाईल बँकिंग करताय, तर हे लक्षात ठेवा

बँकिंग फसवणूकीची संख्या पाहता आयसीआयसीआय बँकेने  (ICICI Bank)  ग्राहकांना बँकिंग घोटाळ्यांविरूद्ध सतर्क राहण्यास सांगितले आहे.

Updated: Jul 4, 2021, 08:07 PM IST
ICICI बँककडून ग्राहकांना अलर्ट! मोबाईल बँकिंग करताय, तर हे लक्षात ठेवा title=

मुंबई : देशातील दुसर्‍या क्रमांकाची खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) ग्राहकांना बँकिंग घोटाळ्याबाबत सतर्क केले आहे. बँकेने मोबाईल बँकिंग वापरताना ग्राहकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. यासंदर्भात बँकेने ट्विट देखील केले आहे. बँकिंग फसवणूक टाळण्यास मदत करण्यासाठी त्यांच्याकडून या ट्वीटरमार्फत येथे काही टीप दिल्या आहेत. जेणेकरून ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही, अन्यथा त्यांचे खाते हॅक होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळापासून बँकिंग फसवणूकीची संख्या पाहता आयसीआयसीआय बँकेने  (ICICI Bank)  ग्राहकांना बँकिंग घोटाळ्यांविरूद्ध सतर्क राहण्यास सांगितले आहे. बँकेने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, सतर्क रहा आणि सेफ बँकिंग कसे करावे याचा चांगला अभ्यास करा.

जर तुमच्या मोबाईलवर नेटवर्क नसेल, अलर्ट मॅसेज येत नसेल किंवा कोणताही मॅसेज येत नसेल तर लगलेच तुमच्या नेटवर्क ऑपरेटरला संपर्क साधा.

या दरम्यान, बँकेने ग्राहकांना सिम स्वॅपद्वारे होणाऱ्या फसवणूकी विषयी देखील इशारा दिला आहे.

आयसीआयसीआयने यासाठी काही टिप्सदेखील शेअर केल्या आहेत, ज्यात ग्राहकांना सिम स्वॅपच्या माध्यमातून तुमचा नोंदणीकृत क्रमांक बंद करुन हे भामटे नवीन सिम घेऊन स्वत: तो वापरतात आणि त्यावर बँकेचा ओटीपी मिळवतात आणि तुमच्या अकाउंटमधून ते पैसे काढतात.

सिम स्वॅप म्हणजे काय?

मोबाईल बँकिंगद्वारे आपण आर्थिक व्यवहार करतो. यासाठी आवश्यक असलेला, वन टाईम पासवर्ड (ओटीपी), युनिक नोंदणी क्रमांक (यूआरएन), थ्रीडी सिक्योर कोड हे आपल्या मोबाईलशी कनेक्ट असते, आणि ते मिळवण्यासाठी चोर सिम स्वॅपचा वापर करतात.

यात ते मोबाईल सेवा कंपनीकडून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासाठी नवीन सिम कार्ड देण्याची व्यवस्था करतात. नवीन सिमकार्डच्या मदतीने, ते तुमच्या बँक खात्याशी आर्थिक व्यवहार करण्यासाठी आवश्यक यूआरएन / ओटीपी नंबर मिळवतात आणि तुमचे पैसे काढतात.