भाविकांना कधीपासून घेता येणार 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन? समुद्रात 300 फुट खोल राेमांचक प्रवास

 India First Submarine Tourism : 5 हजार वर्षांपूर्वी  श्री कृष्णाची द्वारका नगरी समुद्रात बुडाली होती. समुद्रात बुडालेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीचे दर्शन आता भक्तांना घेता येणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 25, 2024, 05:04 PM IST
भाविकांना कधीपासून घेता येणार 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन? समुद्रात 300 फुट खोल राेमांचक प्रवास title=

Submarine ride for Old Dwarka:  5000 वर्षांपूर्वी  समुद्रात बुडालेल्या द्वारकानगरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतले. मोदींच्या हस्ते द्वारकेतील सुदर्शन सेतूचं लोकार्पण करण्यात आले. खोल समुद्रातील द्वारका शहरात जाऊन मोदींनी भगवान श्रीकृष्णाची पूजाअर्चा केली. लवकरच आता भाविकांना देखील  समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन घेता येणार आहे. समुद्रात 300 फुट खोल असा हा राेमांचक प्रवास असणार आहे. 

समुद्राच्या तळाशी संशोधकांना सापडले द्वारकेचे अवशेष 

श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका नगरी समुद्रात बुडाली, असं म्हटलं जातं. मात्र, भारतीय पुरातत्व विभागाने 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्री कृष्णाच्या द्वारका नगरी शोधून काढली आहे. समुद्राच्या तळाशी संशोधकांना द्वारकेचे अवशेष सापडले आहेत. समुद्रात बुडालेल्या श्री कृष्णाच्या द्वारकेचे भाविकांना देखील दर्शन घेता येणार आहे. गुजरात सरकार  समुद्रात बुडालेले द्वारका शहर दाखवणार आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे धार्मिक पर्टन होणार आहे. पाणबुडीच्या माध्यामतून समुद्रात 300 फूट खाेलवर असलेल्या द्वारकेचे दर्शन घेता येणार आहे.  

5 हजार वर्षांपूर्वी श्री कृष्णाची द्वारका नगरी समुद्रात बुडाली

5 हजार वर्षांपूर्वी  श्री कृष्णाची द्वारका नगरी समुद्रात बुडाली. समुद्रात बुडालेल्या भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकानगरीचे दर्शन आता सहज शक्य होणार आहे. गुजरात सरकाराने द्वारका दर्शनासाठी अरबी समुद्रात ‘प्रवासी पाणबुडी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. या अनोख्या पर्यटनासाठी भारत सरकारची कंपनी माझगाव डाॅक शिपयार्डसाेबत गुजरात सरकारने करार केला. जानेवारीतील व्हायब्रंट संमेलनात याबाबती अधिकृत घाेषणा करण्यात आली होती.

300 फूट खोल समुद्रात जाणार पाणबुडी

राज्य पर्यटन विभागाचे प्रमुख सचिव हारित शुक्ला यांनी या संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली होती.  द्वारका दर्शनासाठी स्वदेशी पाणबुडी तयार करण्यात आली आहे. याचे संचालन माझगाव डाॅक येथे करण्यात आले. श्री कृष्ण जन्माष्टमी किंवा दिवाळीपर्यंत द्वारका दर्शन सेवा सुरू करण्याचा गुजरात सरकारचा प्रयत्न आहे.  ही प्रवासी पाणबुडी समुद्रात 300 फूट खाेलवर जाणार आहे.  दाेन ते अडीच तासांची ही राेमांचक सफर असणार आहे. 

भक्तांना  द्वारका परिक्रमेचा अनुभव 

केंद्र सरकार देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला प्राेत्साहन देत आहे. या अंतर्गतच हा प्रकल्प राबवला जाणार आहे.  द्वारका काॅरिडॉरअंतर्गत मूळ द्वारकेच्या (बेट द्वारका) दर्शनासाठी पाणबुडी प्रकल्प राबवला जाणार आहे. बेट द्वारकेत अरबी समुद्रात सर्वात माेठा केबल पूल तयार असेल. जन्माष्टमीच्या जवळ ताेे खुला हाेईल. याद्वारे लोकांना द्वारका परिक्रमेचा अनुभव घेता येणार आहे. 

अशी असेल पाणबुडीची रचना 

ही पाणबुडी 35 टन वजनाची असणार आहे. या पाणबुडीत एकावेळी 30 लाेक बसू शकतात. यात मेडिकल किटही असेल. या पाणबुडीत  24 प्रवाशी दाेन रांगेत बसतील अशी आसन व्यवस्था असेल. दाेन चालक, 2 मानवी पाणबुड्या, एक गाइड व एक तंत्रज्ञ साेबत असेल. संकट समयीचा मार्ग म्हणून प्रत्येक आसनाला खिडकी असेल. यातून सागरतळातील नैसर्गिक साैंदर्य सहजपणे पाहता येऊ शकेल. देवभूमी काॅरिडॉरअंतर्गत बेट द्वारकाला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. सर्वात माेठे आकर्षण सिग्नेचर ब्रिज आहे. 900 काेटी रुपयांत 2320 मीटर लांबीचा हा चाैपदरी पूल भारतातील सर्वात माेठा केबल पूल असेल. तो 90 टक्के तयार झाला आहे.