देशात उन्हाच्या झळा तीव्र, 'या' शहरात 41 अंश तापनाची नोंद...IMD ने जारी केला अलर्ट

Hitwave in India : देशातील बहुतांश राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने झळा असह्य झाल्या आहेत. काही शहरात तर कमाल तापमान 41 अंशाच्यावर गेल्याने मार्च महिन्याच्या अखेरपासूनच तापमान वाढू लागलं आहे.

राजीव कासले | Updated: Mar 29, 2024, 03:53 PM IST
देशात उन्हाच्या झळा तीव्र, 'या' शहरात 41 अंश तापनाची नोंद...IMD ने जारी केला अलर्ट title=

Hitwave in India :  कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने देशात तीव्र उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 41 अंशांच्या वर गेला आहे. देशात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. देशातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heatwave) पसरली आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र (Maharashtra), मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशच्या काही भागात उष्णतेच्या तीव्री लाटेची शक्यता वर्तवली आहे. 28 मार्चाल अनेक शहरात तापमान 41 अंश नोंदवलं गेलं आहे. हवामान विभागाने (India Meteorological Department) नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. 

महाराष्ट्रात विदर्भात उष्णतेची लाट
महाराष्ट्रातील विदर्भावत तापमान 42.6 अंश नोंदवलं गेलं आहे. तर मध्यप्रदेशच्या गुना शहरात 41.6 तापमनाची नोंद झाली आहे. कुरनूल आणि नांदयाल शहरात तापमान  41.9 आणि 42.0 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. केंद्रीय हवामान विभागाना या शरहातील लोकांसाठी सतर्कतेचा आदेश दिला आहे. दुपारच्या वेळेस कामाशिवाय बाहेर पडू नका असा सल्ला हवामान विभागाने दिलाय. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही देण्यात आलंय. 

उष्णतेची लाट म्हणजे काय?
उष्णतची लाट हा उच्च तापमानाचा कालावधी असतो, जो सामान्य तापमानापेक्षा जास्त असतो. उत्तर-पश्चिम आणि दक्षिम भागात साधारण मार्च ते जून दरम्यान उष्णतेची लाट पसरते. भारतीय हवामान विभागाच्या मते, जेव्हा सर्वोच्च तापमान मैदानी भागासाठी किमान 40.0°C आणि डोंगराळ प्रदेशांसाठी किमान 30.0°C पर्यंत पोहोचते तेव्हा ती उष्णतेची लाट मानली जाते. कमाल तापमान 45.0°C पेक्षा जास्त होते तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात आणि जेव्हा कमाल तापमान 47.0°C पेक्षा जास्त होते तेव्हा ती तीव्र उष्णतेची लाट म्हणून वर्गीकृत केली जाते.

उन्हाळ्यात 'या' आजारांची शक्यता
उन्हाळ्यात अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते.. यात उष्माघात, जंतुसंसर्ग, डायरिया, कावीळ, टायफॉईड,  गोवर, कांजण्या, गलगंड, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार, मुतखडा  इत्यादी समस्यांचा समावेश आहे.