भारतीय लष्काराचा हिममानव 'येती'च्या पाऊलखुणा आढळल्याचा दावा

'येती' हा जगातील रहस्यमयी प्राणी असल्याचं म्हटलं जातं

Updated: Apr 30, 2019, 08:58 AM IST
भारतीय लष्काराचा हिममानव 'येती'च्या पाऊलखुणा आढळल्याचा दावा title=

नवी दिल्ली : हिममानव येती अस्तित्वात असल्याचा पाऊलखुणा आढळल्याचा दावा भारतीय सैन्यदलानं केलाय. सैन्यदलानं या संदर्भात काही छायाचित्रंही जारी केलेत. त्या छायाचित्रात दिसणाऱ्या पाऊलखुणा या 'येती' या हिममानवाच्या असल्याचा दावा करण्यात आलाय. सैन्यदलानं यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिलीय. भारतीय लष्करानं केलेल्या या ट्विटमुळे जगभरात पुन्हा एकदा 'खरंच हिममानव अस्तित्वात आहे का?' या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय. 

भारतीय सैन्य दलाच्या 'माऊंन्टेनरिंग एक्सपेडिशन टीम'ला ९ एप्रिल २०१९ रोजी मकालू बेस कॅम्पजवळ ३५ X १५ इंच इतक्या अवाढव्य आकाराच्या हिममानवाच्या पाऊलखुणा निदर्शनास आल्या. भारतीय सैन्याच्या @adgpi या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून याचे काही फोटोही जाहीर करण्यात आलेत. 

 

मकालू-बरून नॅशनल पार्कमध्ये या पाऊलखुणा आढळल्यात. 'येती' हा जगातील रहस्यमयी प्राणी असल्याचं म्हटलं जातं. 

यापूर्वी लडाख भागातील काही बौद्ध मठांनीही हिममानव 'येती' पाहिल्याचा दावा केला होता. परंतु, संशोधनकर्त्यांनी मात्र हा 'मनुष्य' नाही तर ध्रवीय आणि तपकिरी रंगाच्या अस्वलाची 'क्रॉस ब्रीड' अर्थात संकरीत जात असल्याचा दावा केला होता. काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, या विशालकाय जीवाचा चेहरा वानरांसारखा असला तरी ते मानवाप्रमाणे दोन पायांवर चालतातय.