भारतीय मोबाईलवर व्यतीत करतात 'इतके' तास !

बंगळूर : सतत मोबाईलवर असल्याची घरातल्यांची तक्रार खरी ठरवणारी माहिती समोर आली आहे. स्मार्टफोनवर अॅक्टिव्ह असणारे भारतीय युजर्स दिवसातील ४ तास मोबाइल अॅपवर असतात, अशी माहिती पुढे आली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 7, 2017, 08:29 PM IST
भारतीय मोबाईलवर व्यतीत करतात 'इतके' तास ! title=

बंगळूर : सतत मोबाईलवर असल्याची घरातल्यांची तक्रार खरी ठरवणारी माहिती समोर आली आहे. स्मार्टफोनवर अॅक्टिव्ह असणारे भारतीय युजर्स दिवसातील ४ तास मोबाइल अॅपवर असतात, अशी माहिती पुढे आली आहे. म्हणजे कामाचे ८ तास पकडले तर त्यातील निम्मा वेळ हा मोबाइल अॅपवर खर्ची होतो.  त्यामुळे मे २०१७ मध्ये सर्वाधिक अँड्रॉइड अॅप वापरण्यात भारताचा क्रमांक पहिल्या पाचात होता. अॅप अॅनी या कंपनीने केलेल्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे. 

दक्षिण कोरिया, मेक्सिको, ब्राझिल आणि जपान या देशातील लोक मोबाईलवर सुमारे ५ तास घालवतात. तर भारतात स्मार्टफोनवर अॅक्टिव्ह नसलेले युजर्सदेखील दिवसाचा दीड तास फोनवर घालवतात. जे अधिक अॅक्टिव्ह ही नाहीत आणि इनअॅक्टिव्ह नाहीत असे लोक सुमारे २.५ तास मोबाईल अॅपवर व्यतीत करतात. या सगळ्यात व्हॉट्स अॅपचा क्रमांक सर्वात वरचा आहे. 

या अभ्यासासाठी अॅप अॅनी कंपनीने अँड्राइड फोन वापरणाऱ्या १० मोठ्या देशांचे निरीक्षण केले. यात शॉपिंग अॅप्स, ट्रॅव्हल, गेम्स अॅप हे सर्वाधिक वापरणारे अॅप आहेत. मोबाईल शॉपिंग करण्यात देखील भारतीय अव्वल आहेत. एक भारतीय एका महिन्याला सरासरी ९० मिनिटे मोबाईल शॉपिंगसाठी देतो. यात भारताच्या आधी दक्षिण कोरियाचा क्रमांक लागतो. मोबाईल शॉपिंगमध्ये भारताच्या नंतर ब्राझिल (४५ मिनिटे) आणि फ्रान्सचा (३० मिनिटे) क्रमांक लागतो.