रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर...; लहानशा चुकीमुळं होऊ शकतो कारावास, 'हा नियम कायम लक्षात ठेवा

Indian Railway : भारतीय रेल्वे विभागाकडून कायमच प्रेक्षकांच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. किंबहुना जर तुम्ही रेल्वे प्रवासात सराईत असाल तर, काही गोष्टी माहित असणं अतिशय गरजेचं.   

सायली पाटील | Updated: Aug 31, 2023, 12:33 PM IST
रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर...; लहानशा चुकीमुळं होऊ शकतो कारावास, 'हा नियम कायम लक्षात ठेवा title=
Indian Railway if tte is not there who check the tikets know details

Indian Railway : आशिया खंडातील दुसऱ्या आणि जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वेचं जाळं असणाऱ्या भारतीय रेल्वेमध्ये दर दिवशी एखादी नवी गोष्ट जोडली जाते. या मार्गानं प्रवास करणारे असंख्य प्रवासी दर दिवशी अपेक्षित स्थळी पोहोचतात आणि या सेवेचा उपभोग करतात. मुळात प्रवाशांनाच केंद्रस्थानी ठेवत रेल्वे सर्व योजना आखत असली तरीही याच रेल्वे प्रवासासाठी काही नियमही आखण्यात आले आहेत. काही नियम इतके कठोर आहेत, की तुम्हाला थेट कारावासही होऊ शकतो. 

टीटीईकडे लक्ष द्या अन्यथा.... 

रेल्वे प्रवासादरम्यान टीटीई आपली तिकीट पाहतो ही बाब आपल्यासाठी नवी नही. पण, आपण जेव्हा प्रवास पूर्ण करून अंतिम स्थानकावर पोहोचतो तिथंही अनेकदा आपलं तिकीट तपासलं जातं. पण, ही व्यक्ती टीटीई नसते. तुम्हाला हे माहित होतं का? 

लक्षात घ्या, की आपण जेव्हाजेव्हा रेल्वे प्रवास करतो तेव्हातेव्हा तिकीट सोबत असणं बंधनकारक आहे. रेल्वेचं तिकीट काढल्याशिवाय प्रवास करणं तुम्हाला महागात पडू शकतं. रेल्वेप्रवासादरम्यान एक गोष्ट पाहिलीये का, एक तिकीट तपासणारी व्यक्ती ट्रेनमधूनच प्रवास करत असते. ही व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून, ती व्यक्ती असते टीटीई अर्थात Train Ticket Examiner. 

टीटीई ही रेल्वे प्रवासादरम्यान तुमचं तिकीट तपासतात. जर या प्रवासादरम्यान एखाद्या व्यक्तीकडे तिकीट नसेल, तर त्या व्यक्तीला दंड ठोठावला जातो. प्रकरण गंभीर असल्यास त्या व्यक्तीला कारावासही होऊ शकतो. हो पण, नियमानुसार टीटीईलाही काही बंधनं आहेत. कारण, रात्री 10 वाजल्यानंतर टीटीई तुमचं तिकीट तपासण्यासाठी येऊ शकत नाही. 

हेसुद्धा वाचा : नवा नियम! वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा विचारच सोडा, नाहीतर शिक्षा भोगा...

आता तुम्ही म्हणाल हे टीटीई रेल्वेमध्ये तिकीट तपासतात, तर रेल्वे प्लॅटफॉर्मवर मात्र ते कुठेच दिसत नाहीत. मग, इथं तिकीट तपासायला येणारी माणसं कोण? रेल्वे प्रवासानंतर प्लॅटफॉर्मवर उतरताच तुमचं तिकीट तपासण्यासाठी समोर उभी असणारी व्यक्ती असते TC. सहसा रेल्वेतून प्रवास करताना एखादा तिकीट नसणारा प्रवासी टीटीईपासून पळ काढू शकतो. पण, टीसीच्या नजरेतून प्लॅटफॉर्मवरून त्यांना पळ काढणं कठीण असतं. कारण, तिथं रेल्वे पोलिसांची पथकं आणि सीसीटीव्हीही तैनात असतात. प्रकरणाला गंभीर वळण मिळाल्यास एखाद्या प्रवाशाला मोठा दंड किंवा कारावासाची शिक्षाही ठोठावली जाते.