वाईन, व्हिस्की, वोडका, बिअर, ब्रँडी, रम... या सर्वांमध्ये फरक काय? जाणून घ्या

बऱ्याच लोकांना बिअर, वोडका आणि वाइन हेच तीन प्रकार माहित असतात.

Updated: Oct 16, 2021, 12:41 PM IST
वाईन, व्हिस्की, वोडका, बिअर, ब्रँडी, रम... या सर्वांमध्ये फरक काय? जाणून घ्या title=

मुंबई : दारूबद्दल कोणाला बोलताना तुम्ही ऐकले असाल तर, त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या दारुची नावं समोर अलेली तुम्ही एकली असाल, त्यावेळी जे लोकं दारु पित नाहित किंवा ज्यालोकांना दारुबद्दल फारशी माहिती नसते तेव्हा त्यांच्या मनात एकच प्रश्न मनात येतो ते म्हणजे वाइन, व्हिस्की, ब्रँडी वोडका, बिअर, जिन आणि बरेच अशी दारुची नावं घेतली जातात. पण हा दारुचा नक्की काय प्रकार आहे? त्यात कोणत्या प्रकारची दारु असते? तर आज आम्ही तुम्हाला याबद्द्ल माहिती देणार आहोत.

बऱ्याच लोकांना बिअर, वोडका आणि वाइन हेच तीन प्रकार माहित असतात. परंतु व्यतिरिक्त देखील दारु चे प्रकार असतात आणि त्यात अल्कोहोलचं प्रमाण वेगवेगळं असतं.

प्रामुख्याने अल्कोहोलचे दोन प्रकार आहेत. यानंतर ते वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. एक म्हणजे अनडिस्टिल्ड ड्रिंक्स (Undistilled Drinks) आणि एक डिस्टिल्ड ड्रिंक्स(Distrilled Drinks) . बिअर, वाइन, हार्ड सायडर सारखे मद्य हे अनडिस्टिल्ड ड्रिंक्समध्ये समाविष्ट आहेत. त्याच वेळी, डिस्टिल्ड ड्रिंक्समध्ये ब्रँडी, वोडका, टकीला रम इत्यादींचा समावेश आहे.

आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की डिस्टिल्ड ड्रिंक्सची एक्स्पायरी डेट नसते आणि ती कधीही वापरली जाऊ शकते, तर अनडिस्टिल्ड ड्रिंक्स एका मर्यादेनंतर खराब होतात.

अनडिस्टिल्ड ड्रिंक्स

बिअर- बिअरची गणना अल्कोहोलिक पदार्थांमध्ये केली जाते. असे म्हटले जाते की, बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण 4 ते 6 टक्के असते. ह्यात सुद्धा हलक्या म्हणजेच लाईट किंवा माइल्ड बिअर मध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी केलं जाते आणि इतर बिअर मध्ये त्याचे प्रमाण 8 टक्क्यांपर्यंत असू शकते.

वाइन- वाइन एक अतिशय लोकप्रिय अल्कोहोलिक पेय आहे. वाइनमध्ये 14 टक्के अल्कोहोल असल्याचे मानले जाते. त्यामध्ये अल्कोहोल भिन्न प्रमाणात असू शकतात. जसे पोर्ट वाइन, शेरी वाइन, मडेरा वाइन, मार्सला वाइन इ. काही वाइनमध्ये 20 टक्के अल्कोहोल असू शकतो.

हार्ड सायडर- हा एक प्रकारचा सफरचंद रस मानला जातो आणि त्यात 5 टक्के अल्कोहोल असते.

डिस्टिल्ड ड्रिंक

जिन- जिन जुनिपर बेरीपासून बनवले जाते. त्यात 35 ते 55 टक्के अल्कोहोल असते.

ब्रँडी- वांद्री ही एक प्रकारची डिस्टिल्ड वाईन आहे. त्यात 35 ते 60 टक्के अल्कोहोल असते.

व्हिस्की- व्हिस्की आंबलेल्या धान्यांपासून बनवली जाते. त्यात 40 ते 50 टक्के अल्कोहोल असते.

रम- रम हे आंबवलेल्या उसापासून बनवले जाते. त्यात 40 टक्के अल्कोहोल असते. परंतु तेथे अनेक अतिरंजित रम्स देखील आहेत, त्यात अल्कोहोलचे प्रमाण जास्त आहे आणि त्यात 60-70 टक्के अल्कोहोल आहे.

टकीला- हा देखील एक प्रकारचा मद्य आहे. हे मॅक्सिन एगेव वनस्पतीपासून बनवले जाते. त्यात अल्कोहोलचे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत आहे.

वोडका- वोडका भारतात खूप लोकप्रिय आहे. हे तृणधान्ये आणि बटाट्यांपासून बनवले जाते आणि त्यात अल्कोहोलचे प्रमाण 40 टक्क्यांपर्यंत असते.