पृथ्वीवर मनुष्याचं अस्तित्व संकटात, Sperm बाबत संशोधकांच्या अहवालात धक्कादायक माहिती

Sperm Count Decrease New Study: पृथ्वीवर मानवी अस्तित्वासाठी शुक्राणू महत्त्वाची भूमिका बजावतात. शुक्राणूंवर प्रजनन क्षमता अवलंबून असते. मात्र गेल्या काही वर्षात शुक्राणूंची घटणारी संख्या चिंता वाढवणारी आहे. 

Updated: Nov 16, 2022, 09:42 PM IST
पृथ्वीवर मनुष्याचं अस्तित्व संकटात, Sperm बाबत संशोधकांच्या अहवालात धक्कादायक माहिती title=

Sperm Count Decrease New Study: पृथ्वीवर मानवी अस्तित्वासाठी शुक्राणू महत्त्वाची भूमिका बजावतात. शुक्राणूंवर प्रजनन क्षमता अवलंबून असते. मात्र गेल्या काही वर्षात शुक्राणूंची घटणारी संख्या चिंता वाढवणारी आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये लोकांच्या शुक्राणूंची संख्या सातत्याने कमी होत आहे. संशोधकांच्या एका चमूने हा धक्कादायक दावा अहवालात केला आहे. ह्युमन रिप्रॉडक्शन अपडेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 53 देशांचा डेटा गोळा करण्यात आला आहे. हा डेटा गोळा करण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागला. दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिकेतील देशांचा समावेश आहे. शुक्राणू कमी झाल्याने फक्त प्रजनन क्षमताच नाही, तर इतर आजारांचाही धोका वाढतो. यामुळे टेस्टिक्युलर कर्करोग होण्याचीही दाट शक्यता आहे. संशोधकांच्या मते, शुक्राणूंची संख्या कमी झाल्यामुळे वयही कमी होते.

हिब्रू विद्यापीठाचे प्राध्यापक हेगाई लेविन यांनी सांगितलं की, भारतातून अधिक डेटा प्राप्त झाला आहे. या आकडेवारीनुसार, भारतातील लोकांमध्येही शुक्राणूंची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या 46 वर्षांत जगभरातील शुक्राणूंच्या संख्येत 50 टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसून आले आहे.

"येत्या काही वर्षांत पुनरुत्पादनावर अधिक परिणाम होईल. आजची जीवनशैली, वातावरणातील रसायनांचा शुक्राणूंवर वाईट परिणाम होत आहे. ही समस्या हाताळली नाही, तर माणसाचे अस्तित्व धोक्यात येईल.", असंही लेविन यांनी पुढे सांगितलं. 

Shocking Video: रेल्वे ट्रॅक क्रॉस करतना निघालं बूट, तितक्यात ट्रेन आली आणि...

स्पर्म काउंट असा वाढवा

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. जंक फूड आहारातून वगळावं. तुम्हाला दारू आणि सिगारेट पिण्याची सवय असेल तर ती ताबडतोब बंद करा. तुम्ही नियमित व्यायाम करा आणि तणावपूर्ण परिस्थितींपासून दूर रहा.