१ लाख गुंतवा, काही महिन्यात १.४२ लाख कमावण्याची संधी

काही कंपनी अशादेखील आहेत ज्या ४२ टक्के फायदा मिळवून देत आहेत.

Updated: Jun 9, 2018, 04:07 PM IST
१ लाख गुंतवा, काही महिन्यात १.४२ लाख कमावण्याची संधी  title=

नवी दिल्ली : मोदी सरकारने गेल्या ४ वर्षात देशात वेगवेगळ्या योजना आणि स्किम आणल्या आहेत. परवडणारे गृह कर्ज, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, जिडिटल इंडिया, जनधन, बॅंकरप्सी कोड, मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया अशा अनेक स्किम आणल्या आहेत. याचा थेट फायदा सामान्य नागरिकांना मिळतोय.  यातील काही कंपनी अशादेखील आहेत ज्या ४२ टक्के फायदा मिळवून देत आहेत.

१) टीमलीज 

टीमलीज एचआर कंसल्टंसी कंपनी असून ती स्किल्ड वर्कर्ससाठी काम करते. कंपनीचे ८ रिजनल ऑफिस असून १००० कर्मचारी काम करतात. साधारण २५०० कॉर्पोरेट्स क्लाइंट्ससोबत कंपनी काम करत आहे.

किती मिळेल रिटर्न 

ब्रोकरेज हाऊस एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार कंपनीचे शेअर ३३०० किंमतीपर्यंत पोहोचू शकतात.  आता एका शेअरची किंमत २८२१ रुपये आहे. म्हणजेच १७ टक्के रिटर्न तुम्हाला मिळू शकतो. जर कोणी १ लाख रुपये गुंतवलात तर १.१७ लाख रुपये मिळू शकतात.

२) इंडियाबुल्स हाऊसिंग 

इंडियाबुल्स हाऊसिंग देशातील दुसरी मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे. परवडणाऱ्या हाऊसिंग स्कीम्सचा या कंपनीला मोठा फायदा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.कंपनीची असेट क्वालिटी आणि लोन ग्रोथ मजबूत आहे.

किती मिळेल रिटर्न 

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या माहितीनुसार काही महिन्यात कंपनीचे भाव वाढून १६५० रुपये होऊ शकतात. आता एका शेअरची किंमत १२०३ रुपये आहे. एका वर्षाच्या आत ३७ टक्के रिटर्न मिळू शकतो. जर कोणी १ लाख रुपये गुंतविले तर काही महिन्यात १.३७ लाख रुपये मिळतील.

३) स्टरलाइट टेक्नोलॉजी 

स्मार्ट सिटी योजनेनुसार १०० स्मार्ट बनविण्याचे लक्ष्य आहे. कंपनीला जयपुर, गांधीनगर, काकीनाडा इथे स्मार्टसिटीची ऑर्डर मिळाली आहे. २०१४ मध्ये स्टरलाईट टेक्नोलॉजीचा भाव हा २८ रुपये प्रतिशेअर होता. आता याची किंमत ३०० रुपये प्रति शेअर आहे.

किती मिळेल रिटर्न 

'ब्रोकरेज हाऊस आयसीआयसी डायरेक्ट'ने दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यात स्टरलाइट टेक्नोलॉजीच्या शेअरचा भाव ४४० रुपये होणार आहे. सध्याच्या शेअरची किंमत ३०३ रुपये आहे. कंपनीच्या गुंतवणुकदारांना ४२ टक्के रिटर्न मिळू शकते. म्हणजे कोणी १ लाख रुपये गुंतवल्यास त्याला १.४२ लाख रुपये मिळू शकतात.