इस्रोची जोरदार तयारी, 7 महिन्यात 19 मिशन करणार लॉन्च

इस्रोचं सर्वात मोठं मिशन

Updated: Sep 3, 2018, 11:48 AM IST
इस्रोची जोरदार तयारी, 7 महिन्यात 19 मिशन करणार लॉन्च title=

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर ISRO ने जोरदार तयारी सुरु केली आहे. पुढच्या 7 महिन्यात इस्रो 19 मिशन लॉन्च करणार आहे. यामध्ये चंद्रयान-2 मिशन देखील आहे. इस्रो याच महिन्यापासून याची सुरुवात करणार आहे. इस्रोचे चेअरमन के. शिवन यांच्या माहितीनुसार, 'इस्रो 19 स्पेस मिशन कंडक्ट करणार आहे. ज्यामध्ये 10 सॅटलाईट आणि 9 लॉन्च वेइकल असणार आहेत. हे सगळे मिशन सप्टेंबर ते मार्च दरम्यान पूर्ण केले जाणार आहेत. 15 सप्टेंबरला PSLV C42 मिशनच्या लॉन्चिंगची सुरुवात केली जाणार आहे.'

यानंतर पुढच्या महिन्यात ऑक्टोंबरमध्ये इस्रो 'बाहुबली' नावाच्या GSLV MkIII-D2 चं लॉन्चिंग करणार आहे. 4 टन लिफ्टिंग क्षमता असलेल्या इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटचं हे लॉन्चिंग असणार आहे. याच महिन्यात PSLV C43 चं देखील लॉन्चिंग होणार आहे. याचप्रमाणे नोव्हेंबरमध्ये वायु सेनेचं GSAT-7A आणि GSAT-11 चं लॉन्चिंग होणार आहे. डिसेंबरमध्ये PSLV C44 आणि GSAT-31 लॉन्च होणार आहे.

इस्रो पुढच्या वर्षी सुरुवातीलाच बहुप्रतीक्षित चंद्रयान-2 मिशन पूर्ण करणार आहे. याचं लॉन्चिंग 3 जानेवारीला होणार आहे. इस्राईल देखील याच वेळी चंद्रयान मिशन लॉन्च करणार आहे. दोन्ही देशांमध्ये याबाबत स्पर्धा असणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंगबाबत रशिया, अमेरिका आणि चीन यांच्यानंतर भारत चौथा देश असणार आहे.

जानेवारीमध्ये PSLV C45 रॉकेट रिमोट सेंसिंग सॅटलाईट Risat-2B ला अवकाशात घेऊन जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये PSLV C46 रॉकेट दोन सॅटलाईट Cartosat-3 आणि नेक्स्ट जनरेशन NEMO AM सॅटलाईट लॉन्च करणार आहे. यानंतर मार्च महिन्यात Risat-2BR1,  Risat-2B, Cartosat-3 आणि Risat-2BR1 सॅटलाईट्स लॉन्च करणार आहेत.