Cloudburst : अमरनाथ गुफेला ढगफुटीचा तडाखा, क्षणार्धात व्हिडीओ व्हायरल

यात्रा बंद असल्यामुळं या भागात कोणाचाही वावर नव्हता, पण... 

Updated: Jul 28, 2021, 07:40 PM IST
Cloudburst : अमरनाथ गुफेला ढगफुटीचा तडाखा, क्षणार्धात व्हिडीओ व्हायरल  title=
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : बुधवारी (Jammu Kashmir) जम्मू आणि काश्मीरमध्ये असणाऱ्या (Amarnath Cave) अमरनाथ धाम येथील गुफेलाही ढगफुटीचा तडाखा बसल्याचं वृत्त समोर आलं आहे. यात्रा बंद असल्यामुळं या भागात कोणाचाही वावर नव्हता, त्यामुळं सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. 

21 जून रोजी जम्मू आणि काश्मीर प्रशासनाकडून (Corona) कोरोना संसर्गाचं संकट पाहता त्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात्रेकरुंसाठी यात्रा रद्द करण्यात आली असली तरीही परंपरागतरित्या सुरु असणारा पुजाविधी करण्यास मात्र मुभा देण्यात आली होती. एका दिवसात नोंदवली गेलेली ही तिसरी ढगफुटीची घटना ठरली आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरच्या किश्तवारसह लडाखमध्येही ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली होती. 

Cloudburst : निसर्ग कोपतो तेव्हा काय घडतं? पाहा Top 3 व्हिडीओ 

 

'पीटीआय'च्या वृत्तानुसार किश्तवार जिल्ह्यातील दूरच्या एका गावामध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला तर, जवळपास 17 जण यामध्ये दुखापतग्रस्त झाले. तर, कारगिल येथे झालेल्या (Cloudburst) ढगफुटीमध्ये विद्युत प्रकल्पाचं नुकसान झालं असून, अनेक घरांसह काही शेतांचंही नुकसान झालं. या भागात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अमरनाथ गुफा परिसरात झालेल्या ढगफुटीनंतर नदीकाठच्या प्रदेशांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. 

हिमाचल प्रदेशलाही ढगफुटीचा तडाखा 
तिथे (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेशातही लाहौल स्पितीमध्ये ढगफुटी झाल्यामुळं अनेक भागांना पुराचा तडाखा बसला आहे. कुल्लू, शिमला, मंडी भागातही याचे परिणाम दिसून आले आहेत. निसर्गाचं हे रौद्र रुप पाहत सध्या सर्वत्र प्रशासन सतर्क असून नागरिकांनाही या परिस्थितीत सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.