Anantnag Encounter: सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. 

Updated: May 28, 2022, 09:24 PM IST
Anantnag Encounter: सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार title=

Anantnag Encounter: जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) अनंतनागमध्ये (Anantnag) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. अनंतनागच्या बिजबेहारा भागातील शितीपोरा इथं ही चकमक झाली. दहशतवाद्यांकडून (Terrorists) शस्त्रास्त्रांसह अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून इश्फाक अह गनी आणि अयुब दार अशी त्यांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  इश्फाक हा अनंतनागमधील चकवानगुंडचा रहिवासी होता. तर अयुब दार हा अवंतीपोरा इथल्या डोगरीपोरा इथला रहिवासी होता.  दोन्ही दहशतवादी प्रतिबंधित संघटना एचएमशी संबंधित होते. इश्फाक आणि अयुबने अनेक दहशतवादी गुन्हे केले आहेत. 

बारामुल्लात दहशतवाद्याला अटक
याआधी, शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली होती. याबाबतची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. दहशतवाद्याच्या साथीदाराच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला इथल्या अथुरा बाला पुलावर वाहन तपासणी केली होती. तपासादरम्यान, सुरक्षा दलाला एक व्यक्तीच्या हालचालींवर संशय आला.

संशयीत व्यक्तीचा पळण्याचा प्रयत्न
त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला अटक केली. मोहम्मद सलीम खान असं या दहशतवाद्याच्या साथीदाराचं नाव असून तो श्रकवारा करेरी इथला रहिवासी आहे. तपासणीदरम्यान, खानकडून एक पिस्तूल, एक मॅगझिन आणि पाच गोळ्या आणि इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.