शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शोपियामध्ये सेना सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त टीम हे ऑपरेशन हाताळत आहे

शुभांगी पालवे | Updated: Feb 27, 2019, 09:15 AM IST
शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, दोन दहशतवाद्यांचा खात्मा title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलंय. हे दहशतवादी जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचं समजतंय. सेना, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त टीम हे ऑपरेशन हाताळलं. सुरक्षा दलाकडून सध्या कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.

मिमेंदर भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर भारताच्या सुरक्षा दलांनी त्यांना घेरलं होतं. सुरक्षा दलानं घेरल्यानंतर रात्रीपासून दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू होता. त्याला  शोपियामध्ये  गेल्या दोन-तीन तासांपासून सुरू असलेला हा गोळीबार आता थांबला असला तरी अवचित घटनांचा धोका मात्र कायम आहे. 

मंगळवारी भारतीय सेनेनं सीमेपार पाकिस्तानी गोळीबाराला प्रत्यूत्तर देताना जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या पलिकडील पाकिस्तानच्या पाच चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. या कारवाईत पाकिस्तानच्या सैन्यदलालाही फटका बसलाय. जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीनजिक १२ ते १५ चौक्यांवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानी सेना सीमानजिक गावांतील नागरिकांना कवच म्हणून वापरत आहे. त्यांच्या घरात लपून पाकिस्तान सेनेकडून गोळीबार सुरू आहे.