Janmashtami 2022 : कसा बनवाल Perfect पांढराशुभ्र लोण्याचा गोळा, जाणून घ्या सर्वात बेस्ट ट्रिक

याहून सोपी पद्धत तुम्ही पाहिलीच नसेल 

Updated: Aug 17, 2022, 10:38 AM IST
Janmashtami 2022 : कसा बनवाल Perfect पांढराशुभ्र लोण्याचा गोळा, जाणून घ्या सर्वात बेस्ट ट्रिक  title=
Janmashtami 2022 how to make white butter for krishna

Janmashtami 2022 : कृष्णजन्माच्या निमित्तानं लाडक्या कान्हासाठी 56 भोग तयार करण्याचा घाट अनेकजण घालणार असतील. त्यासाठीची तयारीही पूर्ण झाली असेल. कृष्णासाठी तयार केल्या जाणाऱ्या या सर्व गोष्टींमध्ये किंबहुना त्याला स्नान घालण्यासाठीसुद्धा एका अशा घटकाचा वापर केला जातो, जो त्याला अतीव प्रिय. हा घटक म्हणजे लोण्याचा गोळा. (Janmashtami 2022 how to make white butter for krishna)

लोणी तसं सर्वांच्याच आवडीचं. पण, तो योग्य प्रकारे तयार कसं करावं हे मात्र फार क्वचितजणांनाच जमतं. तुम्हालाही Prfect लोण्याचा गोळा बनवायला शिकायचंय का? ही एक प्रक्रिया पाहा आणि पाहा कसा सुरेख लोण्याचा गोळा तुम्हीही तयार करता. 

फ्रेश क्रिम किंवा साठववलेली दुधाची साय, या सासाठी लागणारा साहित्याला मह्त्वाचा भाग. क्रिम किंवा साठवललेली साय फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर यामध्ये थोडं दही मिसळा. 

आता ही साय मिक्सर किंवा फूड प्रोसेसरच्या मोठ्या भांड्यात टाका आणि तो सुरु करा. मिक्सर/ फूड प्रोसेसर तोपर्यंत सुरु ठेवा जोपर्यंत लोणी आणि त्यातल्या पाण्यावर तरंगण्यास सुरुवात होत नाही. 

जेव्हा पाणी आणि लोणी वेगळं होईल तेव्हा हात स्वच्छ धुवून किंवा एखाद्या लाकडी चमचाच्या सहाय्यानं वर तरंगणारं लोणी अलगद एका भांड्यात काढा. पांढरंशुभ्र लोणी घरच्या घरी तयार... 

फ्रिजमध्ये ठेवल्यास हा लोण्याचा गोळा आठवडाभर खराब होणार नाही. त्यापासून तूप तयार करायचं असल्यास जाड तळ असणाऱ्या एका भांड्यात हा गोळा घ्या आणि मंद आचेवर तो वितळवण्यास सुरुवात करा. असं केल्यानंतर तुम्हाला साजूक तूप तयार मिळेल. लोणी वितळवण्यास सुरुवात करताच एका चमचानं हे मिश्रण हळूवारपणे हलवत राहा, म्हणजे तळाला काहीच चिकटणार नाही.