Jatashankar Dham: तीन डोळे तीन शिंगं, जटाशंकर धाममधील प्रसिद्ध नंदी बैलाचे निधन!

Nandi bull with three horns and three eyes: जटाशंकर धाम येथील प्रसिद्ध नंदी बैलाला तीन शिंगं (Three horns) होते. तसेच या बैलाला तीन डोळे (Three eyes) देखील होते. या नंदी बैलाचं आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. 

Updated: Nov 19, 2022, 04:03 PM IST
Jatashankar Dham: तीन डोळे तीन शिंगं, जटाशंकर धाममधील प्रसिद्ध नंदी बैलाचे निधन! title=
Jatashankar Dham Nandi

Jatashankar Dham Nandi: वैदिक धर्मात नंदी बैलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक परंपरेनुसार नंदी बैल (Nandi Bail) म्हणजे भगवान शंकराचं प्रमुख वाहन आहे. त्यामुळे लोकांच्या भावना देखील आणखी प्रकट होताना दिसतात. अशातच आता मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) छतरपूर जिल्हातील बुंदेलखंडमधील केदारनाथ धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या जटाशंकर धाम (Jatashankar Dham Nandi) येथील प्रसिद्ध नंदी बैलाचं निधन झालं आहे. (nandi bull with three horns and three eyes passed away in chhatarpur madhya pradesh)

साधारणत: प्रत्येक नंदी बैलाला दोन शिंगं असतात. मात्र, जटाशंकर धाम येथील प्रसिद्ध नंदी बैलाला तीन शिंगं (Three horns) होते. तसेच या बैलाला तीन डोळे (Three eyes) देखील होते. या नंदी बैलाचं आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. मंदिर समितीच्या सदस्यांनी नंदीबैलाचा अंत्यसंस्कार संपूर्ण विधींनुसार पुर्ण केला. ब्राम्हणांच्या उपस्थितीत मंत्रपठण करत नंदी बैलाचे अंत्यसंस्कार झाले. जटाशंकर धाममधील विशेष आकर्षण हा नंदी होता.

दरम्यान, 15 वर्षापूर्वी हा नंदी फिरत फिरत जटाशंकरमध्ये आला होता. तीन डोळे आणि तीन शिंगं असल्याने गावभर चर्चा झाली. त्यानंतर तो तिथेच राहू लागला. लोकांनी त्यांचं नाव नंदी ठेवलं. भक्त ज्यावेळी जटाशंकर धाममध्ये येत असत त्यावेळी ते नंदीचं देखील दर्शन घेत असत.

आणखी वाचा - Trending: एज इस जस्ट नंबर! वृद्ध सरदारांचा भांगडा डान्स व्हायरल; पाहा Video

नंदीच्या मृत्यूनंतर महिलांनी नंदीच्या मृतदेहाजवळ बसून भजन आणि कीर्तन केलं. जो ज्याठिकाणी बसायचा, त्याचठिकाणी त्याची समाधी देखील बांधण्यात येणार आहे. जटाशंकर धाम म्हणजे खूप आकर्षक ठिकाण. अनेक भाविक आणि पर्यटक भेटी देत असतात. मात्र, आता भाविकांना नंदीचं दर्शन घेता येणार नाही.