कपिल सिब्बल आमचे प्रतिनिधी नसून राजकारणी

अयोध्येतील वादग्रस्त भूमीवरुन सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान या खटल्याची सुनावणी 2019 लोकसभा निवडणुकीपर्यंत टाळण्याच्या कपिल सिब्बल यांच्या विनंतीवर सुन्नी बोर्डाने सवाल उपस्थित केलाय. 

Updated: Dec 7, 2017, 01:40 PM IST
कपिल सिब्बल आमचे प्रतिनिधी नसून राजकारणी title=

नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त भूमीवरुन सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान या खटल्याची सुनावणी 2019 लोकसभा निवडणुकीपर्यंत टाळण्याच्या कपिल सिब्बल यांच्या विनंतीवर सुन्नी बोर्डाने सवाल उपस्थित केलाय. 

विधान चुकीच 

कपिल सिब्बल हे आमचे प्रतिनिधी नसून राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात दिलेले विधान चुकीचं असल्याचे याचिकाकर्ते हाजी मेहबूब यांनी म्हटलंय. या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय यावा अशी मागणी मेहबूब यांनी केलीय.

सिब्बल यांची विनंती 

 सोमवारी या प्रकरणी खटल्याची सुनावणी २०१९ पर्यंत टाळावी अशी विनंती सिब्बल यांनी कोर्टात केली होती. यावेळी त्यांनी निवडणुकांचा उल्लेख केला नव्हता. मात्र अप्रत्यक्षरित्या त्यांचा रोख निवडणुकांकडे होता असा आरोप आता होतोय. 

सुनावणी टाळण्याची अपील 

 दरम्यान मुस्लिम पक्षकारांचे प्रतिनिधित्व करणा-या वकिलांनी आपल्या अशिलांच्या सांगण्यावरून खटल्याची सुनावणी टाळण्याची अपील केली होती असं विधान ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या जफरयाब जिलानी यांनी केलंय.