Cobra Bite Women: कोब्रा चावल्यानंतर आईचा प्राण वाचवण्यासाठी मुलीने तोंडाने चोखून काढलं विषारी रक्त; दवाखान्यात गेल्यानंतर...

Daughter Sucks Cobra Venom Saves Mother: ही महिला शेतामधून परत येत असताना तिला साप चावला. सापाच्या शेपटीवर पाय पडल्याने सापाने महिलेच्या पायाला दंश केला. या महिलेला आधी हा साप विषारी आहे की नाही याबद्दलची कल्पना नव्हती तरी तिने तात्पुरत्या स्वरुपात पायाला गवत बांधून रक्तपुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला.

Updated: Mar 22, 2023, 07:38 PM IST
Cobra Bite Women: कोब्रा चावल्यानंतर आईचा प्राण वाचवण्यासाठी मुलीने तोंडाने चोखून काढलं विषारी रक्त; दवाखान्यात गेल्यानंतर... title=
Snake Bite Women

Daughter Sucks Cobra Venom To Save Mother: आई आपल्या मुलांवर किती प्रेम करते हे वेगळं सांगण्याची गरज आहे. मात्र मुलांचंही आपल्या आईवर तेवढेच प्रेम असते. आईवर आलेल्या कोणत्याही संकटाच्या प्रसंगी मुलं जीवावर खेळून आईला वाचवण्याचा प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रकार कर्नाटकमध्ये नुकताच घडला. येथील एका तरुणीने आपल्या आईला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. कर्नाटकमधील (Karnataka) दक्षिण कन्नड जिल्ह्यामधील पुत्तूरमधील (Puttur) कीयूरमध्ये राहाणाऱ्या ममता राय यांना कोब्रा सापाने दंश मारला. त्यानंतर आपल्या आईचा जीव वाचवण्यासाठी मुलगी श्रम्या रायने स्वत: तोंडांने आईच्या शरीरामधील विष चोखून बाहेर काढलं. श्रम्या ही महाविद्यालयीन विद्यार्थीनी असून तिची आई ग्रामपंचायतीची सदस्या आहेत. श्रम्याने दाखवलेलं धाडस पाहून केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाळे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन तिचं कौतुक केलं आहे.

नेमकं घडलं काय?

ममता या त्यांच्या माहेरी असताना शेतात गेल्या होत्या. त्यावेळी शेतात घरी परत येताना त्यांनी चुकून सापाच्या शेपटीवर पाय ठेवला आणि त्यानंतर या कोब्रा सापाने दंश मारला. आपल्याला साप चावल्याचं समजल्यानंतर ममता यांनी ज्या ठिकाणी सापाने दंश मारला तिथे सुक्या गवताने बांधलं. साप विषारी असेल तर विष संपूर्ण शरीरामध्ये भिनू नये म्हणून त्यांनी गवताने पायाच्या इथे दंश झालेल्या भागाजवळचा रक्तप्रवाह संथ करण्यासाठी तात्पुरता उपाय केला.

..आणि तिने विष चोखलं

ममता यांनी घरी आल्यानंतर आपल्याला सापाने दंश केल्याचं सांगितलं. हे ऐकल्यानंतर ममता यांची मुलगी श्रम्या हिने लगेच आईच्या पायाला जिथे सापाने दंश केला होता तेथील रक्त तोंडाने चोखून बाहेर काढलं. त्यानंतर ममता यांना जवळच्या महिला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. रुग्णालयामध्ये पोहचल्यानंतर ममता यांना चावलेला साप हा विषारी होता हे समजलं. श्रम्याने वेळीच रक्त चोखून विष बाहेर काढल्याने ते ममता यांच्या शरीरामध्ये पूर्णपणे भिनलं नाही आणि त्यांचा जीव वाचल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ममता यांना जो साप चावला होता तो मालाबार पिट व्हाइपर प्रजातीचा विषारी साप होता.

चित्रपटांमध्ये पाहिलं होतं

ममता यांना एका दिवसासाठी रुग्णालयामध्ये दाखल करुन देखरेखीखाली ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांना डिस्टार्ज देण्यात आलं. श्रम्या तिच्या कॉलेमध्ये गाइड रेंजर आणि स्काउटमध्ये आहे. एखाद्या व्यक्तीला साप चावल्यानंतर त्याच्या शरीरामधील विष बाहेर काढता येतं हे मी ऐकलं होतं आणि चित्रपटांमध्येही पाहिलं होतं असं श्रम्या म्हणाली.

सर्पदंशाने भारतात 64,100 मृत्यू 

नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, जागतिक स्तरावर सर्पदंश झाल्याने होणाऱ्या 78,600 मृत्यूंपैकी 64,100 मृत्यू भारतात होतात.