कर्ज फेडण्यासाठी इंजिनीअर झाला किडनॅपर, बायको आणि युट्युबर मुलीसह...

Crime News In Marathi: कर्ज फेडण्यासाठी एका उच्च शिक्षित व्यक्तीने अपहरणाचा मार्ग पत्करला आहे. या व्यक्तीने सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले. 

Updated: Dec 3, 2023, 11:06 AM IST
कर्ज फेडण्यासाठी इंजिनीअर झाला किडनॅपर, बायको आणि युट्युबर मुलीसह... title=
Kerala Engineer turn kidnapper to repay loan news in marathi

Crime News In Marathi: कर्जात बुडालेल्या इंजिनीअर कर्ज फेडण्यासाठी चक्क किडनॅपर झाला आहे. इतकंच नव्हे तर, त्याने त्याच्या पत्नी आणि युट्यूबर मुलीलाही या गुन्ह्यात ओढले. शनिवारी एका सहा वर्षांच्या मुलीला किडनॅप करुन 10 लाखांची खंडणी मागण्याच्या आरोपांवरुन केरळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पद्मकुमार (52) त्याची पत्नी अनीता कुमारी (45) आणि त्यांची मुलगी अनुपमा पद्मन (20) यांना वैज्ञानिक, डिजीटल पुराव्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपीची मुलगी अनुपमा पद्मन ही युट्युबर असून तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. मात्र, तिनेही वडिलांच्या गुन्ह्यात साथ दिल्याचे समोर आले आहे. 

अपहरण झालेल्या मुलीची सुटका झाल्यानंतर चौकशी करण्यात आली त्यानुसार आरोपी पद्मकुमारचे स्केच रेखाटण्यात आले. त्या स्केचच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपहरणामागे या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. एडीजीपी एमआर अजितकुमार यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने खंडणीसाठी फोन केला होता. मात्र त्याचवेळी स्थानिक लोकांनी आरोपीचा आवाज ओळखला होता. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात यश आले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गेल्या एक वर्षांपासून अपहरणाचा प्लान आखत होता. त्यासाठी तो श्रीमंत घरातील मुलांच्या शोधात होता. 

आरोपी व्यवसायाने कप्युंटर सायन्स इंजिनीअर होता. त्याचा स्थानिक केबल नेटवर्कचा व्यवसाय होता. मात्र, करोना महामारीनंतर त्याला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्याच्यावर 5 कोटींपेक्षा अधिक कर्ज होते. त्याला 10 लाखांची तात्काळ गरज होती. त्यामुळंच कुटुंबीयांनी अपहरण करण्याचा प्लान आखला. आरोपीचा दावा आहे की त्याने अन्य लोकांच्या गोष्टींवरुन प्रेरीत झाला. ज्या लोकांनी अपराधाच्या माध्यमातून पैसे कमावले त्याप्रमाणेच त्याच्याही डोक्यात तसाच प्लान तयार झाला आणि त्याने अपहरणाचा डाव रचला. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणाचा प्लान यशस्वी करण्यासाठी आरोपीने त्याच्या कारसाठी दोन बनावट नंबर प्लेट तयार केल्या होत्या. पोलिसांना संशय आहे की, यामागे त्याची पत्नी अनिता कुमारी हिचे डोकं आहे. आरोपीने याआधीही दोन वेळा मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अपयशी झाला. आरोपीची मुलगी अनुपमा हिला सोशल मीडियाच्य माध्यमातून चांगली कमाई होत होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळं अचानक तिची कमाई बंद झाली. त्यामुंळ अन्य मार्गाने पैसा कमवण्यासाठी त्यांनी अपहरणाचा डाव रचला.