Kerala Crime: आधी दारु पाजली अन् मग...; नर्सिंगच्या विद्यार्थिनीने दाखल केली Gang Rape ची तक्रार

Kerala Gang Rape Kozhikode: कॉलेजमधील समुपदेशनाच्या कार्यक्रमादरम्यान हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर या तरुणीने पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे.

Updated: Feb 22, 2023, 03:20 PM IST
Kerala Crime: आधी दारु पाजली अन् मग...; नर्सिंगच्या विद्यार्थिनीने दाखल केली Gang Rape ची तक्रार title=
Rape Case

Kerala Gang Rape केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील नर्सिंगच्या एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला आहे. काझिकोडे जिल्ह्यामध्ये शनिवारी ही घटना घडली. आरोपींनी या तरुणीला दारु पाजली आणि त्यानंतर ती नशेत असतानाच तिच्याशी दुष्कर्म केलं.

या तरुणीनेच पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कॉलेजमधील काऊन्सलिंग सेशनदरम्यान या मुलीने घडलेला हा प्रकार सांगितल्यानंतर प्रकरण समोर आल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे.

या तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार कॉलेच्या माध्यमातून मित्र झालेल्या या दोन आरोपींनी तरुणीला घरी आमंत्रित केलं होतं. मिनी बायपासजवळ असलेल्या आरोपींच्या घरी ही तरुणी पोहोचली तेव्हा आधीपासूनच ते मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी या तरुणीवर बळजबरी करुन तिलाही दारु पाजली. यानंतर त्यांनी या तरुणीवर सामुहिक बलात्कार केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ही तरुणी शुद्धीवर आली तेव्हा तिने तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि तिथून पळून गेली. आपण केलेल्या कृत्याची जाणीव झाल्यानंतर दोन्ही आरोपी या मुलीला घरात टाकून पळून गेले. आरोपींपैकी एकजण कोझीकोडेमधील आहे. तर दुसरा आरोपी हा एर्नाकुलममधील आहे. 

मुलीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी तुकड्या रवाना केल्या असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

मागील आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेमध्ये एका नृत्यांगनेवर 6 जणांनी सामुहिक बलात्कार केला होता. उन्नाव जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला. येथील एका प्रॉपर्टी डिलरच्या पार्टीमध्ये डान्स करण्यासाठी गेलेल्या या तरुणीचा लैंगिक छळ करुन नंतर तिच्यावर या नरधमांनी आळीपाळीने बलात्कार केला होता.