या राज्यांत आजपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त

देशभरात पेट्रोलच्या किंमतींवरुन लोकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळतेय. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दरात घसरण होतेय. 

Updated: Jun 1, 2018, 10:38 AM IST
या राज्यांत आजपासून पेट्रोल-डिझेल स्वस्त title=

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोलच्या किंमतींवरुन लोकांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळतेय. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दरात घसरण होतेय. मात्र ही कपात अवघ्या काही पैशांची आहे. इंधनाच्या किंमती वाढ असतानाच केरळ सरकारने जूनपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रती लीटर एक रुपयाने कपात करण्याचे ठरवले आहे. राज्य सरकार यासाठी विक्री करात कपात करणार आहे. 

३० म रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. दरम्यान सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवारी इंधनाच्या दरात कपात केल्यानंतल केरळमध्ये एक जूनला पेट्रोलच्या दरात एक रुपये दहा पैशांची कपात झालीये. शुक्रवारी या राज्यात पेट्रोलचे दर ८१.५४ पैसे इतके आहेत.

मुख्यमंत्री पी विजयन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने इंधनाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. नव्या किंमती शुक्रवारपासून लागू झाल्यात. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला ५०९ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. 

सलग तिसऱ्या दिवशी स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल

डिझेल आणि पेट्रोल च्या किंमतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालीये. याप्रमाणे गेल्या तीन दिवसांत डिझेल ११ पैशांनी स्वस्त झालेय. तर पेट्रोलच्या दरात १४ पैशांनी स्वस्त झालेय. याआधी पेट्रोलच्या दरात ३० मेला १ पैसे आणि ३१ मेला ७ पैशांची घसरण झाली होती. गेल्या तीन दिवसांत पेट्रोलच्या दरात एकूण १४ पैशांची कपात करण्यात आलीये. शुक्रवारी डिझेल ५ पैशांनी स्वस्त झाले. याआधी डिझेलच्या दरात ३०मेला १ पैसे आणि ३१ मेला ५ पैशांची कपात झाली होती. याप्रमाणेच गेल्या तीन दिवसांत डिझेलच्या दरात ११ पैशांची कपात झाली. 

सरकारी तेल कंपन्याकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, दिल्लीत आता पेट्रोलचे दर ७८.२९ रुपये प्रती लीटर धालेत. तर डिझेलचे दर ६९.२० रुपये प्रती लीटर झालेत. इंधनाच्या किंमती राज्यातील स्थानिर करांच्या हिशोबाने बदलत असतात. सर्व मेट्रो शहरे आणि इतर राज्यांच्या तुलनेत राजधानी दिल्लीत सर्वात कमी किंमत आहे. 

महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमती

दिल्ली - 78.29 रुपये प्रति लीटर
कोलकाता -  80.92 रुपये प्रति लीटर
मुंबई - 86.10 रुपये प्रति लीटर
चेन्नई - 81.28 रुपये प्रति लीटर

महानगरांमध्ये डिझेलच्या किंमती

दिल्ली - 69.20 रुपयेप्रति लीटर
कोलकाता -  71.75 रुपये प्रति लीटर
मुंबई - 73.67 रुपये प्रति लीटर
चेन्नई - 73.06 रुपये प्रति लीटर