आयफोनच्या मदतीने अबु दुजाना या दहशतवद्याला केलं ठार

जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दहशतवादी अबु दुजानाच्या मृत्यूची पुष्टी केली. पोलिसांनी म्हटलं की, पाकिस्तानच्या लष्कर कमांडर अबु दुजाना आपल्या साथीदारांसह पुलवामाच्या हाकिमपुरामध्ये मारला गेला. सुरक्षारक्षकांना आणि पोलिसांना मोठं यश मिळालं.

Updated: Aug 1, 2017, 01:06 PM IST
आयफोनच्या मदतीने अबु दुजाना या दहशतवद्याला केलं ठार title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विट करत दहशतवादी अबु दुजानाच्या मृत्यूची पुष्टी केली. पोलिसांनी म्हटलं की, पाकिस्तानच्या लष्कर कमांडर अबु दुजाना आपल्या साथीदारांसह पुलवामाच्या हाकिमपुरामध्ये मारला गेला. सुरक्षारक्षकांना आणि पोलिसांना मोठं यश मिळालं.

सुरक्षारक्षकांच्या हाती अबु दुजानाचा आयफोन लागला होता. आयफोनच्या मदतीनेच सुरक्षा रक्षकांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला ठार केलं.

अबु दुजानाच्या घराला घेरलं गेलं जे त्याच्या पत्नीचं होतं. त्याने काही दिवसांपूर्वीच काश्मीरी मुलीशी लग्न केलं होतं. तो लष्कराकडे सात लाख रुपये मागत होता कारण त्याला त्याच्या पत्नीला भारताबाहेर न्यायचं होतं.