आधार-पॅन कार्ड लिंक कसं करायचं? आताच करा...डेडलाईन येतेय जवळ

तुम्ही जर पॅन कार्ड अजूनही आधारशी लिंक केलं नसेल, तर तातडीने करा. कारण आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्चला संपणार आहे. मात्र शेवटच्या दिवशी गोष्टी करण्याचं ठेवण्यापेक्षा आजच तुम्ही आधार-पॅन कार्ड लिंक करून घ्या. 

Updated: Mar 19, 2021, 03:45 PM IST
आधार-पॅन कार्ड लिंक कसं करायचं? आताच करा...डेडलाईन येतेय जवळ  title=

मुंबई : तुम्ही जर पॅन कार्ड अजूनही आधारशी लिंक केलं नसेल, तर तातडीने करा. कारण आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्चला संपणार आहे. मात्र शेवटच्या दिवशी गोष्टी करण्याचं ठेवण्यापेक्षा आजच तुम्ही आधार-पॅन कार्ड लिंक करून घ्या. 

आधार कार्डला पॅन कार्ड कसं लिंक करणार?

1. सगळ्यात आधी तुम्हाला Income tax e-Filing पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. 

2. या पोर्टलवर तुम्हाला आयडी, पासवर्ड आणि जन्म तारीख टाकावी लागेल. 

3. या साईटवर लॉग ईन केल्यावर एक नवी विंडो उघडेल, ज्यावर आधार-पॅन लिंक करण्याबाबत लिंक दिसेल. 

4. जर तुम्हाला अशी लिंक दिसली नाही, तर तुम्ही प्रोफाईल सेटिंगवर जाऊन लिंक आधार हा पर्याय निवडू शकता. 

5. यामध्ये तुम्हाला नाव, जन्मतारीख, लिंग ही माहिती भरायची आहे. 

6. तुमच्या आधार कार्डवर असलेल्या माहितीप्रमाणेच तुम्ही या पोर्टलवर तुमची माहिती भरा. 

7. ही माहिती जुळली, की तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आणि खाली असलेली Link now हा पर्यायावर क्लिक करायचं आहे. 

8. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक झाल्याचा मेसेज येईल. 

याआधी आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाईन जुलै 2020 होती, मात्र ती वाढवून आता 31 मार्च 2021 करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही आधार-पॅनला लिंक केलं नसेल, तर आताच करून घ्या.