पावसात धावणं की एका जागी उभं राहणं चांगलं? काय केल्याने तुम्ही जास्त भिजू शकता?

सध्या अचानक वातावरणातल्या बदलामुळे केव्हा ही पाऊस पडायला लागला आहे.

Updated: Jan 25, 2022, 01:31 PM IST
पावसात धावणं की एका जागी उभं राहणं चांगलं? काय केल्याने तुम्ही जास्त भिजू शकता?  title=

मुंबई : सध्या अचानक वातावरणातल्या बदलामुळे केव्हा ही पाऊस पडायला लागला आहे. हल्लीच देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. तसेच घराबाहेर विना छत्री पडलेल्या लोकांची धांदल उडाली आहे. कारण त्या लोकांकडे छत्री नसल्यामुळे लोकांना कुठे जाऊ काय करु हे सुचत नाही. तुम्ही विचार करा की, जर अचानक पाऊस सुरू झाला आणि तुमच्याकडे छत्री नसेल तर तुम्ही काय कराल?

अशा परिस्थितीत काही लोक रस्त्यावरुन पळत जातात. तर काही लोकं रस्त्याच्या बाजूला आढोसाला उभे राहतात. तुम्हाला काय वाटतं, यांपैकी कोणता पर्याय जास्त चांगला आहे?

तुम्हाला माहितीय पळून जाण्याचा निर्णय चुकीचा आहे आणि तुम्ही धावत जाऊन आणखी ओले होतात. तुम्ही पण विचार करत असाल की, असं कसं होईल आणि पळून गेल्याने आपण लवकर निश्चित स्थळी पोहोचतो, मग पावसात पळणं चुकीचं कसं.

पावसात धावणं हे तुमच्यासाठी चुकीचे पाऊल ठरू शकते आणि तुम्ही ओले होऊ नये म्हणून असे करत असाल तर तुम्ही ते चुकीचे करत आहात, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे. पावसात धावणे हा योग्य पर्याय नाही. जाणून घ्या या खास आणि रंजक संशोधनाबद्दल, ज्याबद्दल तुम्हाला फारशी माहिती नाही.

संशोधनात काय म्हटले आहे?

काही तज्ज्ञांमध्ये ही चर्चा झाली आहे की, पावसात धावल्याने माणूस भिजतो किंवा पावसात एकाच जागी उभे राहून पावसापासून बचाव होतो. या विषयावर इटालियन भौतिकशास्त्रज्ञ फ्रँको बोकी यांनी 2012 मध्ये युरोपियन जर्नल ऑफ फिजिक्समध्ये एक शोधनिबंध प्रकाशित केला होता आणि त्यात पावसात धावणे हा योग्य पर्याय नसल्याचे समोर आले होते.

यांनी आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की, 'गणितानुसार अचानक पाऊस पडला आणि पावसापासून बचावासाठी जागा नसेल तर चालण्याऐवजी एका जागी उभे राहा. फक्त तुमचं डोकं झाका. असं केल्याने तुम्ही कमी ओले व्हाल, कारण अशा स्थितीत पावसाचे थेंब अंगावर पडतील.

तुम्ही एकाच ठिकाणी उभे राहिल्यास काय होईल?

अहवालात फ्रँकोच्या संशोधनाच्या आधारे असे सांगण्यात आले आहे की सामान्य परिस्थितीत पाऊस पडत आहे आणि वादळाची स्थिती नाही आणि थेंब थेट पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडत आहेत. त्याच वेळी, पावसाचा दर किंवा प्रति चौरस मीटर प्रति सेकंद पडणार्‍या पाण्याच्या थेंबांची संख्या सारखीच असते. मग या स्थितीत काय होईल जो एका जागी उभा आहे त्याच्यावर ठराविक प्रमाणात पाणी पडेल. (पण या स्थितीत पाऊस सरळ असावा)

जेव्हा एखादी व्यक्ती पावसात चालायला लागते, त्याचा वेग कितीही असो, त्याच्या डोक्यावर आणि खांद्यावर पडणाऱ्या पाण्याच्या दरात कोणताही बदल होत नाही. यासोबतच शरीराचे इतर भागही पाण्याच्या संपर्कात येऊ लागतात. म्हणजेच पळून जाऊन माणूस अधिक भिजतो.