पूर्वी वाघाची भीती वाटायची आता गाईची वाटते - लालू प्रसाद

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा रविवारी साधला आहे. लोकांना पूर्वी वाघांची भीती वाटत असे, आता गाईची वाटते. संपूर्ण देशात गाईबद्धल जागृकता निर्माण केल्याबद्दल धन्यवाद, असे लालूंनी म्हटले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 19, 2017, 07:57 PM IST
पूर्वी वाघाची भीती वाटायची आता गाईची वाटते - लालू प्रसाद title=

पटना : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा रविवारी साधला आहे. लोकांना पूर्वी वाघांची भीती वाटत असे, आता गाईची वाटते. संपूर्ण देशात गाईबद्धल जागृकता निर्माण केल्याबद्दल धन्यवाद, असे लालूंनी म्हटले आहे.

त्या बाजारात आता गुरे नसतातच फारशी...

लालूंनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. पण, राष्ट्रीय जनता दलाच्या एका कार्यक्रमात बोलतानाही लालूंनी गाईच्या मुद्द्यावरून जोरदार टीका करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या बैठकीत मोदी म्हणाले, 'पूर्वी लोक वाघांना घाबरायचे. आता गाईला घाबरतात. ही मोदी सरकारने दिलेली भेट आहे. गाई आणि गुरांसोबत दिसणे म्हणजे भीती वाटते. बिहारच्या सारण जिल्ह्यातील सोनेपूर येथे गुरांचा मोठा बाजार भरायचा. हा बाजार अशिया खंडातील सर्वात मोठा गुरांचा बाजार म्हणून ओळखला जातो. मात्र, या बाजारात आता पूर्वीसारखी गुरे दिसत नाहीत', याकडेही लालूंनी लक्ष वेधले.

नोटबंदीचा सर्वसामान्यांना फटका...

लालू प्रसाद यादव यांनी असेही म्हटले की, 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, भाजपकडून दिलेली अश्वासने सत्तेत आल्याला साडेतीन वर्षे पूर्ण झाली तरीही पूर्ण झाली नाहीत. जनता पंतप्रधा मोदींवर प्रचंड नाराज आहे. लोकांना नोटबंदी आणि जीएसटीमुळे प्रचंड अडचणींचा सामना करवा लागत आहे.

मोदींनी घ्यायच्या आहेत मध्यावधी निवडणुका

2019ला सरकारचा कार्यकाळ संपत आहे. मात्र, मोदींना मद्यावधी निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यामुळे ते 2018मध्येच निवडणुका घेऊ इच्छितात, असा आरोप करतानाच लालू प्रसाद म्हणाले, मध्यावधी निवडणुकांसाठी मोदींचा पक्ष पूर्णपणे तयार आहे. पण, तुम्हाला निवडणूक घ्यायची तेव्हा घ्या. विरोधी पक्ष तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असे लालूंनी ठामपणे सांगितले.

'हार्दिक'च्या संपर्कात 'तेजस्वी'

दरम्यान, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या संपर्कात होते. हार्दिक पटेल आणि तेजस्वी यांच्यासारखे तरूण नेते देशातील जातीयवादी शक्तींचे उच्चाटण करतील, असा विश्वासही लालूंनी या वेळी व्यक्त केला.