मुंबई : How to link Pan-Aadhaar: पॅन क्रमांक आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. परंतु, नवीन आर्थिक वर्षात तुम्हाला कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करायचे असेल, तर ते लिंक करणे अनिवार्य आहे. जर अद्याप पॅन-आधार लिंक झाले नसेल, तर पॅन कार्ड अवैध मानले जाईल. निष्क्रिय पॅनद्वारे आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार नाही.
पॅनकार्ड रद्द झाल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. तुम्ही बँकिंग व्यवहार करू शकणार नाही, मालमत्ता खरेदी-विक्री करू शकणार नाही, शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकणार नाही..
संसदेत सादर करण्यात आलेल्या वित्त विधेयकानुसार आयकर कायद्यात आणखी एक नवीन कलम जोडण्यात आले आहे. ते पॅन-आधार लिंकशी संबधित आहे. आयकर कायदा, 1961 मध्ये जोडलेल्या कलम 234H शी पॅन-आधार लिंक केले नसल्यास, 1000 रुपये पर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
पॅन-आधार लिंक नसल्यास, पॅन कार्ड अवैध घोषित केले जाईल. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही आर्थिक व्यवहारात अवैध पॅन कार्ड वापरल्यास त्याच्यावर 10000 रुपये दंड आकारला जाईल. हा दंड निश्चित करण्याचा अधिकार प्राप्तिकर अधिकाऱ्याला असेल. आयकर कायद्याच्या कलम 272B अंतर्गत 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो.
कलम 139AA अंतर्गत, प्रत्येक नागरिकाला आयकर रिटर्न आणि पॅन कार्ड बनवण्यासाठी अर्जात आधार क्रमांक द्यावा लागेल. त्यामुळे पॅन आणि आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
तुम्ही मोबाईलवरून पॅन कार्डसोबत आधार लिंक देखील करू शकता (पॅन-आधार लिंक). तुम्हाला एसएमएसद्वारे तुमच्या पॅनशी आधार लिंक करावे लागेल. 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवून आधार पॅनशी लिंक केला जाऊ शकतो, असे आयकर विभागाने म्हटले आहे.