Leopard Attack: पिसाळलेल्या बिबट्याचा गाडीवर हल्ला; 10 फूटावरून झेप घेऊन...; पाहा थरकाप उडवणारा Video!

leopard rampage on moving car: बिबट्याचा नेम अगदी अचूक, लक्ष कितीही उंचीवर असला किंवा कितीही लांब असता तरी बिबट्या अचूक हल्ला (Leopard Attack) करण्याची क्षमता ठेवतो.

Updated: Dec 28, 2022, 06:50 PM IST
Leopard Attack: पिसाळलेल्या बिबट्याचा गाडीवर हल्ला; 10 फूटावरून झेप घेऊन...; पाहा थरकाप उडवणारा Video! title=
Leopard Attack Video

Leopard rampage in assams: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Social Media Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजक असतात तर काही व्हिडिओ पाहून थरकाप उडाल्याशिवाय (Thriller Video) राहत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. बिबट्याची एक वार आणि समोरच्या प्राण्याचा खेल खल्लास... बिबट्या (leopard ) वस्तीत शिरलाय, अशी बातमी जरी ऐकली तरी घरातून बाहेर पडणं अवघड होऊन जातं. अशातच एक थरारक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. (leopard rampage in assams jorhat 13 injured in the attack see video how it pounced on a moving van marathi news)

बिबट्याचा नेम अगदी अचूक, लक्ष कितीही उंचीवर असला किंवा कितीही लांब असता तरी बिबट्या अचूक हल्ला (Leopard Attack) करण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे जंगलातच काय तर मानवी वस्तीत देखील त्याच्या नावाची दहशत असते. अशातच आसामच्या जोरहाटमधील पिसळलेल्या बिबट्याने (Crushed Leopard) गाडीवर हल्ला केल्याची घटना घडली.

आणखी वाचा - Corona in India : भारतात Covid-19 ची चौथी लाट सुरू झाली? काय म्हणाले AIIMS चे संचालक

जंगलातील एक बिबट्या शिकार करण्यासाठी मानवी वस्तीत शिरला होता. त्यानंतर वनअधिकाऱ्यांनी (Forest Officer) बिबट्याला मानवी वस्तीकडे धाव घेतली. त्यावेळी लोकांनी बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिबट्या आणखीन पिसळला. बिबट्या दबा धरून बसला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याची धडपकड सुरू केल्यानंतर बिबट्याने थेट वनअधिकाऱ्यांची गाडीवर झडप (Leopard Attack On Car) घातली.

पाहा Video - 

दरम्यान, आसाम राज्यातील (Assam news) जोरहाट परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत 13 जणांना जखमी केले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. त्याचा व्हिडिओ (Leopard Attack Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग शर्थीने प्रयत्न करत आहे.