पंतप्रधान मोदी दिल्ली ते द्वारका प्रवास मेट्रोने करणार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात रामलीला येथील दसरा सोहळ्यात सहभागी होत आहेत.

Updated: Oct 8, 2019, 05:21 PM IST
पंतप्रधान मोदी दिल्ली ते द्वारका प्रवास मेट्रोने करणार title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात रामलीला येथील दसरा सोहळ्यात सहभागी होत आहेत. थोड्याच वेळात ते द्वारका सेक्टर दहा येथे रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करतील. पंतप्रधान मोदी दिल्ली ते द्वारका प्रवास मेट्रोने करत आहेत. या पार्श्वभुमीवर सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला छावणीचे रुप आले आहे. विजयादशमीच्या दिवशी अन्यायावर न्यायाचा विजय साजरा करताना रावणाच्या पुतळ्याचे दहन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे. 

पंतप्रधान मोदींच्या आगमनाची समितीतर्फे विशेष तयारी करण्यात आली आहे. द्वारकेच्या श्रीरामलीला सोसायटीमार्फेत सोमवारी तयारी पूर्ण झाली. पश्चिम दिल्लीचे खासदार प्रवेश वर्मा आणि द्वारका श्री रामलीला सोसायटीच्या राजेश गहलोत यांनी सुरक्षेची जबाबदारी संभाळली आहे.