Stock Market | मार्केटने गाठली ऐतिहासिक उंची; रेकॉर्डब्रेक तेजीमुळे ट्रेडर्सने कमावले 3.5 लाख कोटी रुपये

 मजबूत ग्लोबल संकेतांचा आधार आणि भारतीय अर्थव्यवस्थेने पकडलेली गती यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये रेकॉर्ड तेजीची नोंद झाली आहे

Updated: Aug 30, 2021, 04:06 PM IST
Stock Market | मार्केटने गाठली ऐतिहासिक उंची; रेकॉर्डब्रेक तेजीमुळे ट्रेडर्सने कमावले 3.5 लाख कोटी रुपये title=

मुंबई : मजबूत ग्लोबल संकेतांचा आधार आणि भारतीय अर्थव्यवस्थेने पकडलेली गती यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये रेकॉर्ड तेजीची नोंद झाली आहे.  इंट्राडेमध्ये सेंसेक्स प्रथमच 56958 अंकावर पोहचला तर, निफ्टीने 16951 अंकांचा स्थर गाठला.  बँक, ऑटो, फायनान्स, मेटल्स, फार्मा शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून आली.  आयटी शेअर्समध्ये आज दबाव दिसून येत होता. 

सेंसेक्समध्ये 765 अंकांची तेजी दिसून आली आणि 56890 वर बंद झाला. निफ्टीमध्ये 226 अंकांची तेजी दिसून आली 16931 वर बंद झाला. बाजाराच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीत 3.5 लाख कोटींची वाढ झाली आहे. टॉप गेनर्स कंपन्यांमध्ये BHARTIARTL, AXISBANK, TATASTEEL, TITAN, BAJFINANCE, MARUTI, SBI, M&M,  RELIANCE आणि ICICIBANK यांचा सामावेश आहे.

ही आहेत कारणे
US फेडने संकेत दिले की, व्याजदरांमध्ये वाढ करण्यात येणार नाही. त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये आज तेजीचे वातावरण होते. रुपया देखील मजबूत होऊन 73.38 डॉलरवर पोहचला आहे.