'अब होगा न्याय' द्वारे देशाची मनं जिंकायला काँग्रेस सज्ज

काँग्रेसने 'अब होगा न्याय' थीम साँगची घोषणा करत 'न्याय' या शब्दावर केंद्रीत अभियानास सुरूवात केली आहे. 

Updated: Apr 8, 2019, 03:21 PM IST
'अब होगा न्याय' द्वारे देशाची मनं जिंकायला काँग्रेस सज्ज  title=

नवी दिल्ली : काँग्रेसने रविवारी लोकसभा निवडणुकीसाठीचे 'अब होगा न्याय' थीम साँगची घोषणा करत 'न्याय' या शब्दावर केंद्रीत अभियानास सुरूवात केली आहे. यामध्ये प्रस्तावित किमान उत्पन्न योजना (न्याय) अंतर्गत 'भाजपा शासन काळात झालेल्या अन्याया'चा उल्लेख केला आहे. या अभियानात पार्टी अध्यक्ष राहुल गांधी यांना मध्य ठेवण्यात आले असून त्यांची शैली दर्शवण्यात आली आहे. 

न्याय योजना, गरीबी उन्मूलन, युवांसाठी नोकरी, शेतकरी, महिल आरक्षण, जीएसटी, आरोग्य सेवा, शिक्षण व उद्योग हे मुद्दे उचलण्यात आले आहेत. हे सर्व मुद्दे काँग्रेसच्या जाहीर नाम्यात आहेत.  हजारो कंटेनर ट्रकांवर काँग्रेस जाहीरातीचे पोस्टर्स असणार आहेत. ही जाहीरात देशाच्या विविध भागात पोहोचणार आहे. 

Image result for ab hoga nyay zee

काँग्रेस प्रचार अभियान हे 'न्याय' या संकल्पनेवरच केंद्रीत राहील. हा शब्द पक्षाच्या उत्पन्न योजनेला अधोरेखीत करतोच पण त्यासोबतच समाजातील सर्व वर्गाला न्याय देण्याबद्दलही सांगतो. लोकांची मने जिंकण्याकचे या अभियानाचे लक्ष्य असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेके आनंद शर्मा यांनी सांगितले. लोकांना 'अच्छे दिन'चे आश्वासन देणाऱ्या सरकारने समाजातील मोठा वर्ग संविधानिक अधिकारांपासून वंचित ठेवला. त्यामुळे देशाला न्याय हवा आहे असेही शर्मा म्हणाले. 

Image result for ab hoga nyay zee

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी वाड्रा, अभियान पॅनल सोबत कोअर टीमचे सदस्यही प्रचाराच्या रणनितीत सहभागी आहेत. परसेप्ट या जाहीरात कंपनीचे हे अभियान आहे. तरुणांच्या एका टीमने पार्टीच्या डिजीटल मीडिया अभियानासाठी देखील काम केल्याचे सांगण्यात येत आहे. सिल्वरपुश हे पार्टीच्या डिजीटल मंचचे काम पाहत आहेत. डिझाइन बॉक्स आणि निक्सन सारख्या एजंसी देखील या अभियानात सहभागी असल्याचे सांगण्यात आले.