Loksabha Election: अभिषेक बच्चन करणार राजकारणात एन्ट्री? या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता

Loksabha Election: बिग बी अमिताब बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अभिषेक बच्चन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 

राजीव कासले | Updated: Jul 15, 2023, 06:31 PM IST
Loksabha Election: अभिषेक बच्चन करणार राजकारणात एन्ट्री? या पक्षातून निवडणूक लढवण्याची शक्यता title=

Loksabha Election 2024 : पुढच्या वर्षी म्हणजेच लोकसभा निवडणूक 2024 आता एक वर्षाहून कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. रणनिती आखली जात आहे, जुळवाजुळवीचं राजकारण सुरु झालं आहे. कोणत्या जागेवरुन कोणता उमेदवार निवडणूक लढवेल याबाबत अभ्यास केला जात आहे. यासाठी उमेदवाराची लोकप्रियता, त्याचं काम आणि जातीचं समीकरण हे देखील पाहिलं जातंय. लोकसभेसाठ सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असतानाच एका चर्चेने राजकारणात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

अभिषेक निवडणुकीच्या रिंगणात?
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Abhisheh Bachchan) यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमिताभ बच्चन हे स्वत: उत्तर प्रदेशमधल्या इलाहाबाद (UP Allahabad) मतदार संघाचे खासदार होते. तर आई जया बच्चन (Jaya Bachchan) या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार होत्या.

आता अभिषेक बच्चन हे देखील राजकारणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अभिषेक बच्चन देशातील सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशमधून राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अभिषेक बच्चन इलाहाबाद मतदार संघातून समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) तिकिटावर निवडणूक लढवू शकतो. दरम्यान, अभिषेक बच्चन निवडणूक लढवण्यासंदर्भात सपाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही तसंच बच्चन कुटुंबियांनीही यावर अद्याप आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक बच्चन लोकसभा 2024 साठी निवडणूक लढवू इच्छितो. काही दिवसांपूर्वीच सपा अध्यक्ष अखिलेश यादव मुंबई दौऱ्यावर आले होते. 

बच्चन कुटुंब हे समाजवादी विचारधारा मानणारे आहेत, असं समाजवादी पार्टीचे प्रवक्ता फकरुल हसन चांद यांनी म्हटलं आहे. पण अभिषेक बच्चन हे निवडणूक लढवण्याचा निर्णय सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि पक्षातील मोठे नेते घेतील असं फखरुल हसन चांद यांनी म्हटलं आहे. पण अभिषेख बच्चन खरच निवडणूक लढवणार असेल तर पक्षात त्यांचं स्वागत आहे, त्यांचे वडील अमिताभ बच्चन यांनीही समाजवादी पक्षातून निवडणूक लढवली आहे असंही फखरुल हसन चांद यांनी म्हटलं आहे. इलाहाबादमधून सध्या भाजपच्या रीता बहुगुणा जोशी खासदार आहेत. रीता बहुगुणा माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन यांच्या कन्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी हेमवती नंदन यांचा पराभव केला होता. 

अमिताभ बच्च यांचा जन्मच उत्तर प्रदेशमधल्या इलाहाबादमध्ये झाला आहे. अमिताभ बच्चन यांचे वडिल डॉ. हरिवंश राय बच्चन हे प्रसिद्ध हिंदी कवी होते. हरिवंश राय यांना अमिताभ आणि अजिताब ही दोन मुलं. अमिताभ यांनी अभिनयाचा मार्ग स्विकारला. त्यानंतर आपले मित्र राजीव गांधी यांच्या पाठिंब्याने अमिताभ यांनी राजकारणात प्रवेश केला. अमिताभ बच्चन इलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्याविरोधात निवडणूक लढले. हेमवती बहुगुणा यांचा पराभव करत अमिताभ बच्चन इलाहाबादचे खासदार बनले. पण खासदारकीची कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच अमिताब बच्चन यांनी राजीनामा दिला. सध्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि अभिषेक बच्चनची आई जया बच्चन समाजवादी पक्षाशी जोडल्या गेल्या आहेत. समाजवादी पक्षाच्या त्या राज्यसभा खासदारीह होत्यात.