Anant Chaturdashi 2023 : गणपतीचीअर्थासह संस्कृत नावे, सतत राहील बाप्पाच स्मरण

Baby Names From Ganesh : आज अनंत चतुर्दशी.. बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर निरोप दिला जाणार आहे. गणरायाचा आशिर्वाद कायमच राहावा म्हणून मुलांना ठेवा ही नावे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 28, 2023, 11:43 AM IST
Anant Chaturdashi 2023 : गणपतीचीअर्थासह संस्कृत नावे, सतत राहील बाप्पाच स्मरण  title=

Indian Baby Names From Goddess Ganesh :  घरात बाळाचा जन्म झाला की एकच उत्साह असतो. सगळं वातावरणच बदलून जातं. सगळं घर त्या बाळाच्या अवतीभवची असतं. आणि जर बाळाचा जन्म गणपतीच्या दिवसांमध्ये झाला तर त्याचा उत्साह काही निराळाच असतो. आज गणेश चतुर्दशी यानिमित्ताने आपण बाप्पाची नावे पाहणार आहे. गणेशाची संस्कृतमध्ये जवळपास 108 नावे आहेत. त्यातील आपण काही निवडक आणि युनिक नावे पाहणार आहोत. ही नावे गणरायाच्या नावावरून असल्यामुळे तुमच्या मुलावर गणपतीचा आशिर्वाद कायमच राहिल यात शंका नाही. तुम्ही या नावांमधील छान नाव तुमच्या मुलासाठी निवडू शकता. 

संस्कृतमधील बाप्पाची नावे 

  • अर्हत - गणपती या देवतेचा प्रत्येकजण आदर करतो त्याचं हे संस्कृतमधील नाव. सर्वांकडून आदर मिळवणारा असा देखील या नावाचा अर्थ होतो. 
  • महम - महम या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ आहे सर्वात मोठा असणारा. गणेश हे दैवत आराध्य दैवत म्हणून संबोधल जातं. सर्वात मोठा देव असा देखील या शब्दाचा अर्थ आहे. 
  • सुमुख - बाप्पाकडे कधीही पाहिलं तरी आपल्याला प्रसन्न वाटतं. या नावाचा अर्थ देखील असाच आहे प्रसन्न चेहरा. कायम सुंदर दिसणारा असा बाप्पा... 
  • स्वरूप - गणपतीला एक वेगळं सौंदर्य आहे. सौंदर्याची देवता आणि सत्याचा देव असा या नावाचा अर्थ आहे. 
  • हरिद्र - बाप्पाचं संस्कृतमधील हे अतिशय युनिक नाव आहे. सोन्यासारखी कांती असणारा बाप्पा असा याचा अर्थ आहे. तेजस्वी कांती असलेला असा देखीच याचा अर्थ आहे. 
  • परूष - परूष हे देखील बाप्पाचं अनोख नाव आहे. या नावाचा अर्थ आहे काहीही करण्याची क्षमता असणारी व्यक्ती.
  • देवव्रत - सर्व व्रतांना सुखाचा फळ देणारा बाप्पा. देवव्रत हे चार अक्षरी अतिशय सुंदर असं मुलाचं संस्कृत नाव आहे. तुमच्या मुलासाठी असेल हे अतिशय सुंदर नाव. 
  • अविघ्न - अविघ्न हे गणरायाचं साडे तीन अक्षरी नाव. विघ्नांपासून सुटका मिळवून देणारा असा या नावाचा अर्थ आहे. 
  • गुणीन - सर्व गुणांनी संपन्न असणारा देव... असा या नावाचा अर्थ आहे. ६४ विद्येचा अधिपती असलेल्या बाप्पाचं हे अतिशय युनिक तीन अक्षरी नावं आहे. 
  • अथेश - गणपती हा देवांचा देव आहे. अथेश या नावाचा अर्थ आहे राजा. बुद्धीची देवता असलेल्या बाप्पाचं हे नाव गणरायाला दिलात तर नक्कीच आशिर्वाद राहिल.