रामभक्त हनुमानाच्या जातीवरून राजकीय युद्ध!

राम मंदिराच्या मुद्दयासोबतच चघळण्यासाठी आता रामभक्त 'हनुमानाच्या जाती'चा मुद्दा 

शुभांगी पालवे | Updated: Dec 1, 2018, 03:32 PM IST
रामभक्त हनुमानाच्या जातीवरून राजकीय युद्ध! title=

नवी दिल्ली : राजकीय वर्तुळात राम मंदिराच्या मुद्दयासोबतच चघळण्यासाठी आता रामभक्त 'हनुमानाच्या जाती'चा मुद्दा उकरून काढण्यात आलाय. नुकतंच राजस्थानच्या अलवरच्या मालाखेडात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान हनुमान 'दलित' असल्याचं म्हटलं होतं... त्यावर वाद उभा राहिला... ब्राह्मण समाजानं नाराज होऊन सीएम योगींना कायदेशीर नोटीस धाडली. त्यानंतर एसटी आयोगाचे अध्यक्ष नंद कुमार साय यांनी हनुमान 'अनुसूचित जमाती'चे असल्याचं सांगितलं.... आणि आता तर केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनीदेखील या वादात उडी घतेलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, हनुमान हे आर्य वंशाचे होते... 

सत्यपाल सिंग ट्विट
सत्यपाल सिंग ट्विट

याबद्दल सत्यपाल सिंह यांनी तर्कही दिलाय. केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, राम आणि हनुमानाच्या युगात कोणतीही जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती. कुणीही दलित, वंचित, शोषित नव्हतं. वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानस वाचलंत तर तुम्हाला कळेल की तेव्हा कोणतीही जातिव्यवस्था अस्तित्वातच नव्हती. त्यावेळी केवळ आर्य जात अस्तित्वात होती होती... आणि हनुमान आर्य जातीचे महापुरुष होते.

एसटी आयोगाचे अध्यक्ष नंद कुमार साय यांनीही हनुमानाला अनुसूचित जमातीचे असल्याचं म्हणताना स्पष्टीकरण दिलं होतं. 'मुख्यमंत्री योगींनी हनुमानाला कोणत्या संदर्भात दलित म्हटलं, ती व्याख्या स्पष्ट करू शकत नाहीत. अनुसूचित जमातीतील समाजात हनुमान गिद्ध सब गोत्रातील आहेत. भगवान रामासोबत लढाईत याच वर्गातील लोक होते. त्यामुळे हनुमान दलित नाही तर अनुसूचित जमातीतील आहेत' असा तर्क त्यांनी लढविला होता.