हरवले आहे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकही नाही रजिस्टर्ड, काय कराल...

आधार कार्ड हरवला असेल तर खूप सोप्या पद्धतीत तुम्ही तुमचा आधआर कार्ड पुन्हा मिळवू शकता. 

Updated: Mar 19, 2019, 03:20 PM IST
हरवले आहे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकही नाही रजिस्टर्ड, काय कराल... title=

नवी दिल्ली : आजच्या काळात सर्वात महत्वपूर्ण ओळख पत्र म्हणून आधार कार्डची ओळख आहे. कोणतेही काम असले की आधार कार्डची छायाप्रत मागितली जाते. अगदी छोट्या-छोट्या कार्यालयीन कामासाठी आधार कार्डची गरज भासते. सरकारने आधार कार्डला पॅन कार्ड सोबत लिंक करणे बंधनकारक केले आहे. जर तुमचा आधार कार्ड हरवला तर खूपच पंचायत होते. जर तुमचा आधार कार्ड हरवला असेल तर खूप सोप्या पद्धतीत तुम्ही तुमचा आधआर कार्ड पुन्हा मिळवू शकता. 

सर्वात आधी https://resident.uidai.gov.in संकेतस्थळावर जावून तुमच्या रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुमचा आधार कार्ड पुन्हा मिळवू शकता. महत्वाचे म्हणजे हरवलेला आधार कार्ड मिळवण्यासाठी एनरोल्मेंट प्रक्रियेमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आईडी रजिस्टर्ड करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला मोबाईल क्रमांक रजिस्टर करण्यात अडचणी निर्माण होत असतील आणि आधार कार्ड हरवला असेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. तेव्हा तुम्हाला तुमचा नविन मोबाईल क्रमांक देणे गरजेचे असेल आणि वन टाइम पासवर्डच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे आधार रिप्रिंट करता येणार आहे. या प्रक्रियेसाठी तुम्हाला ५० रूपये शूल्क मोजावे लागेल. 

कसे कराल आधार कार्डला रिप्रिंट

१) uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
२) आधार रिप्रिंट पर्यायावर क्लिक करा.
३) तुमचा आधार क्रमांक आणि अन्य माहिती भरा.
४) मोबाईल क्रमांक वेरिफिकेशन द्या.
५) ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर एसआरएन प्राप्त होईल.
६) आधार कार्ड तुमच्या राहत्या घरी पोहोचवले जाईल.

Tags: