IAS पूजा सिंघलचा घटस्फोट, त्यापूर्वीच दुसऱ्या पतीसोबत...

 पूजा सिंघल आणि अभिषेक झा याची लव्हस्टोरीची चर्चा सध्या रंगली आहे.

Updated: May 9, 2022, 10:37 AM IST
IAS पूजा सिंघलचा घटस्फोट, त्यापूर्वीच दुसऱ्या पतीसोबत...  title=

Pooja Singhal and Abhishek Jha Lovestory : IAS अधिकारी पूजा सिंघल 2-3 दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात EDने 20 ठिकाणी छापे टाकल्यानंतर मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. मात्र अजूनही संपत्तीची मोजणी सुरुच असल्याचं समजतंय. तसेच पूजा सिंघलचा दुसरा पती अभिषेक झा याची सुद्धा कसून चौकशी सुरु आहे. मात्र पूजा सिंघल आणि अभिषेक झा याची लव्हस्टोरीची चर्चा सध्या रंगली आहे. 

कोण आहे पूजा सिंघलचा दुसरा पती?

पूजा सिंघलचा दुसरा पती अभिषेक झा बिहारच्या मुजफ्फरपूरचा आहे. मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा तो संचालक आहे. 

पूजा सिंघल आणि अभिषेकची ओळख कशी?

पूजाने पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर अभिषेकसोबत दुसरं लग्न केलं. मात्र घटस्फोटापूर्वीच अभिषेकसोबत फ्रेंडशीप असल्याचे समजतंय. फेसबूकच्या माध्यमातून दोघांची फ्रेंडशीप झाल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यानंतर जीममध्ये दोघांमध्ये ओळख वाढल्याचं समोर. 

घटस्फोटानंतर दोघांमध्ये जवळीक  - 

पूजाचा पहिला पती राहुल पुरवारसोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिषेकसोबत लग्न करण्याचं ठरवलं. दोघांच्या घरच्यांनी लग्नासाठी परवानगी दिल्यानंतर लग्न पार पडलं. पूजाचं अभिषेकसोबत वैवाहिक जीवन चांगलं सुरु होतं. तर सासरच्या लोकांना व्यवसायात मदत करण्यासाठी घोटाळे करत असल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. 

पूजा सिंघलचं पहिलं लग्न - 

IAS अधिकारी झाल्यानंतर पूजा सिंघलचं पहिलं लग्न IAS अधिकारी राहुल पुरवारसोबत झालं. मात्र लग्नानंतर वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्यामध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. सततच्या वादामुळे त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर पूजाने दुसरं लग्न केलं. 

IAS अधिकारी पूजा सिंघल कोण आहेत? 

पूजा सिंघलचा जन्म देहरादूनचा. देहरादूनच्या गढवाल विश्वविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पूजाने पहिल्याच प्रयत्नात आयएएसची परीक्षा पास केली. शाळेपासून विश्वविद्यालयाच्या शिक्षणापर्यंत पूजाचे नाव टॉपरच्या लिस्टमध्ये असायचे. आयएएस झाल्यानंतर तिने अनेक घोटाळे बाहेर काढले. त्यामुळे ती चर्चेत राहिली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही तिच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. 

पूजा सिंघल यांच्यावर EDची कारवाई - 

मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पथकांनी छापे टाकण्यास सुरुवात केली. नवी दिल्ली, मुंबई, जयपूर, फरीदाबाद, गुरुग्राम, मुझफ्फरपूर, रांची आणि इतर शहरांमध्ये हे छापे टाकण्यात आले. पूजा सिंघलचा दुसरा पती अभिषेकच्या मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह सहा ठिकाणी झडती घेण्यात आली.