LPG ग्राहकांना मोठा दिलासा ! सरकारने बदलले गॅस सिलिंडरशी संबंधित हे नियम

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आहे.  

Updated: Jul 28, 2021, 06:46 AM IST
LPG ग्राहकांना मोठा दिलासा ! सरकारने बदलले गॅस सिलिंडरशी संबंधित हे नियम  title=

मुंबई : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकार ग्राहकांना दिलासा देण्यासाठी गॅस सिलिंडरशी संबंधित हे नियम बदललेत. आता एलपीजी ग्राहकांना एलपीजी सिलिंडर भरण्यासाठी गॅस वितरक निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जात आहे. इतकेच नव्हे तर आपण आपल्या वितरकावर समाधानी नसल्यास पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की एलपीजी ग्राहकांना वितरक निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तो ही त्यांच्या सोयीनुसार.

पेट्रोलियम राज्यमंत्र्यांनी दिली माहिती 

सध्या ग्राहक केवळ नियुक्त केलेल्या वितरकाकडूनच गॅस सिलिंडर भरु शकतात. सध्या ही सुविधा केवळ काही शहरांमध्येच सुरु केली गेली आहे. नंतर याची अंमलबजावणी देशभरात करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकसभेत  पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिली.

ग्राहक वितरकाची निवड करु शकतात

पेट्रोलियम राज्यमंत्री म्हणाले की मोबाइल अ‍ॅपद्वारे किंवा ओएमसी वेब पोर्टलद्वारे लॉग इन करुन ग्राहक वितरकाची निवड करू शकतात. यासह, ग्राहक सिलिंडर वितरित करणार्‍याचे रेटिंग देखील पाहण्यास सक्षम असतील. हे रेटिंग वितरकाच्या मागील कामगिरीच्या आधारे निश्चित केले जाईल. अशा परिस्थितीत वितरकाचे रेटिंग खराब झाल्यास ग्राहक सहजपणे दुसरा एलपीजी वितरक निवडण्यास पात्र राहणार आहे.

रेटिंगबरोबरच तेल कंपन्यांच्या मोबाइल अ‍ॅप किंवा पोर्टलवर वितरकांची यादीही देण्यात येणार आहे. ग्राहकांना सिलिंडर वितरणासाठी त्यांच्या क्षेत्राच्या वितरकाच्या नावावर क्लिक करावे लागेल.

 त्यानंतर अन्यर शहरांमध्ये ही योजना लागू होणार

पहिल्या टप्प्यात ही सुविधा चंदीगड, कोयंबतूर, गुरुग्राम, पुणे आणि रांची येथील ग्राहकांना उपलब्ध करुन दिली जाईल, असे पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाने म्हटले आहे. या शहरांमध्ये ही योजना यशस्वी झाल्यास ती देशातील इतर शहरांमध्येही लागू केली जाईल. 

सध्या नवी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 834.50 रुपये आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रीय राजधानीत 14 किलो एलपीसी सिलिंडरची किंमत 809 रुपये होती. जानेवारी 2021 मध्ये दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती. फेब्रुवारी 2021 मध्ये त्याची किंमत प्रति सिलिंडर 719 रुपये करण्यात आली.