'या' बँकेत खातं असल्यास मिळणार नाही LPG गॅस सिलिंडर सबसिडी

तुमच्याकडेही LPG गॅस सिलिंडर कनेक्शन आहे आणि घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ तुम्ही घेता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 16, 2017, 12:09 PM IST
'या' बँकेत खातं असल्यास मिळणार नाही LPG गॅस सिलिंडर सबसिडी  title=

नवी दिल्ली : तुमच्याकडेही LPG गॅस सिलिंडर कनेक्शन आहे आणि घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ तुम्ही घेता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

केंद्र सरकारकडून एलपीजी गॅस सिलिंडरवर देण्यात येणारी गॅस सिलिंडरवरील सबसिडी थेट ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये जमा होते. मात्र, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने एअरटेल पेमेंट बँकेच्या खातेधारकांच्या अकाऊंटवर एलपीजी सबसिडी ट्रान्सफर न करण्याचं म्हटलं आहे.

मंत्रालयाने सांगितलं आहे की, ज्या ग्राहकांनी एलपीजी सबसिडीसाठी अर्ज केला आहे आणि त्यांचं एअरटेल पेमेंट बँकेत खातं आहे अशा ग्राहकांना गॅस सबसिडीचा लाभ मिळणार नाही.

गेल्या काही दिवसांत एलपीजी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींनुसार, घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी त्यांच्या खात्यात जमा होत नाहीये. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, अशा प्रकारच्या तक्रारी अशा ग्राहकांकडून आल्या आहेत ज्यांचं बँक अकाऊंट एअरटेल पेमेंट बँकेत आहे.

एअरटेल एक टेलिकॉम सेवा पुरवणारी कंपनी आहे, ही कंपनी गेल्या काही महिन्यांपासून आपल्या ग्राहकांना पेमेंट बँकेची सुविधा देत आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलयं की, ज्या ग्राहकांचं अकाऊंट एअरटेल पेमेंट बँकेत आहे आणि त्यांनी आधारसोबत लिंक केलं आहे तर त्यांच्या बँक खात्यात सबसिडी ट्रान्सफर केली जात आहे.