राग हा सर्वात मोठा शत्रू .... जिल्हाधिकारीसारख्या मोठ्या पदावरुन एका क्षणात हकाटलपट्टी

जिल्हाधिकाऱ्यानी हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली आहे

Updated: May 23, 2021, 09:20 PM IST
राग हा सर्वात मोठा शत्रू .... जिल्हाधिकारीसारख्या मोठ्या पदावरुन एका क्षणात हकाटलपट्टी title=

छत्तीसगड : छत्तीसगडमधील सूरजपूर येथील जिल्हाधिकारीऱ्याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाकाळात आपल्याला जमेल तशी मदत करण्याऱ्या शासकीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे असे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशा अधिकाऱ्यांचे लोकांनीही तोंड भरून कौतुक केलं. परंतु छत्तीसगडमधील जिल्हाधिकारी मात्र त्याच्या अत्यंत क्रृर कृत्यामुऴे व्हायरल झाला आहे. त्याचा परिणाम ही त्या जिल्हाधिकाऱ्याला भोगावा लागला आहे.

सूरजपूरच्या त्या जिल्हाधिकाऱ्याचे नाव रणबीर शर्मा आहे. तो एका मुलाला मारत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आपले पद आणि शासकीय ताकदीचा वापर करुन या जिल्हाधिकाऱ्याने त्या मुलाचा मोबाईल तोडला आणि मग त्याला मारत असल्याचे व्हीडिओमध्ये स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.

जिल्हाधिकाऱ्यानी हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने आपली चूक मान्य केली आणि माफी मागितली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, त्यावेळेस स्वत:वरील ताबा सुटल्याने माझ्याकडून हे कृत्य घडले आहे.

या सगळ्या प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्याला हटविण्याचा निर्णय छत्तीसगड राज्य सरकारने घेतला आहे. सीएम भूपेश बघेल यांनी सूरजपूर जिल्हाधिकाऱ्यांची वागणूक निंदनीय असल्याचे म्हटले आहे. घटनेने ते अस्वस्थ झाले असल्याचे सांगितले आहे. त्याच बरोबर त्या तरूण मुलाकडे आणि त्याच्या कुटूंबाकडे दिलगिरी व्यक्त केली.

त्यानंतर जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांच्या जागी गौरव कुमार सिंग यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर रणबीर शर्मा यांची मंत्रालयात सहसचिव म्हणून बदली झाली आहे.

सीएम भूपेश बघेल यांनी लिहिले आहे की, 'सूरजपूर जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी एका तरूणाशी गैरवर्तन केल्याचा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या समोर आला आहे. हे अत्यंत दु: खद आणि निंदनीय आहे. छत्तीसगडमध्ये असे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही.

जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना तातडीने काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.' पुढच्या ट्वीटमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, 'कोणत्याही अधिका ऱ्याचे शासकीय जीवनात असे कृत्य बरोबर नाही. मी या घटनेने नाराज आहे. मी त्या तरूण आणि त्याच्या कुटूंबाची दिलगिरी व्यक्त करतो.'